Crop insurance update आज आपण बनवणार की राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा कधी मिळणार आहे कोणाला पिक विमा मिळणार आहे त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत राज्यातील जवळपास 2308 कोटी पिक विमा मंजूर झालेला आहे आणि याचा पीक विमा आपल्याला त्यात जमा होणार आहे तर बघुयात संपूर्ण माहिती
Crop insurance update संपूर्ण माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण आता पिक विमा मंजूर झालेला आहे जवळपास 2308 कोटी रुपये पिक विमा साठी मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकऱ्याचे जीवन हे पूर्णतः शेतीवर अवलंबून असते शेतीमध्ये पण निसर्गाने जर त्यांना साथ दिली तरच त्यांचं उत्पन्न हे व्यवस्थित होत असतं यावेळेस त्यांना अवकाळी पाऊस असेल त्यानंतर वादळ वारा हा माननीय साथ दिली नाही तर त्यांना मोठा फटका बसतो त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी सरकार हे सहयोग करत असतं पिक विमा असेल किंवा अनुदाना असेल वेळोवेळी त्यांना वाटप चालू असतात आता खरीप हंगामातील जो पिक विमा मिळणार होता त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे
Crop insurance update खरीप हंगाम २०२४ मधील पीक विमा भरपाई राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे रखडली होती. राज्य सरकारने आता विमा कंपन्यांना आपला विमा हप्ता दिला. त्यामुळे खरीपातील विमा भरपाईचे २ हजार ३०८ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवारपर्यंत ही रक्कम जमा होईल, असे कृषी विभागाने सांगितले.
खरीप २०२४ हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या ४ ट्रिगर अंतरर्गत भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना एकूण २ हजार ३०८ कोटी रुपये भरपाई निश्चित झाली आहे. मात्र राज्य सरकारने आपला हप्ता दिला नसल्यामुळे ही भरपाई रखडली आहे
वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप २०२४ मध्ये यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीतून १ हजार ४५५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे जवळपास ३ लाख शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर झाली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०६ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली.
तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून १ लाख ४८ लाख शेतकऱ्यांना १४१ कोटी भरपाई मंजूर झाले आहेत. पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही भरपाई १३ कोटींच्या दरम्यान आहे. यापैकी काही रक्कम यापुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. तर जवळपास ५४ लाख शेतकऱ्यांची भरपाई रखडली होती. ही भरपाई एकूण २ हजार ३०८ कोटी रुपये होती.
राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा आणि आपला विमा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपातील २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याला सुरुवात होईल आणि मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, असे कृषी विभागाने सांगितले.
खरीपातील निश्चित झालेली भरपाईची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पूर्वसूनचना आलेल्या नाहीत. मागील आठवड्यापासून काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्याच्या काही नुकसानीच्या सूचना आलेल्या आहेत. पण चालू रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले नाही, त्यामुळे रब्बीत मोठी भरपाई मिळणार नाही, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे त्याची पूर्ण माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वापर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा
हेडलाईन विमा मिळण्याची ता् खाली
वाचत आल्यास ता. नाव ना गाव
सरकारच जुमलेबाज तसेच बातमी पण जुमलेबाजच