WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beed jilha karyalay थेट सरकारी नोकरी पगार 45हजार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beed jilha karyalay आज आपण पाहणार की आपला थेट नोकरी कशी मिळणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करावा लागेल ऑनलाइन करावा लागेल किंवा ऑफलाइन कोणत्या विभागात नोकरी निघालेले आहेत पगार किती असणार आहेत वयाचे किती अट असणारे कागदपत्र काय लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण बघणार आहोत.

Beed jilha karyalay संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर नोकरीच्या शोधत असाल तर तुम्हाला एक चांगली नोकरी मिळणार आहे कारण आता बीड जिल्हा कार्यालयात भरती निघालेली आहे पगार देखील भरपूर आहे आणि तुम्ही जर चांगले नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे या ठिकाणी किती नोकरीची संधी आहे त्या सर्वांनी कोणत्या विभागात किती नोकरी आहेत किती पद रिक्त आहेत त्याचप्रमाणे अधिकृत वेबसाईट काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत नोकरी मिळवण्याच्या शोधा तुम्ही असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा लेख आहे.

Beed jilha karyalay बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी’ या पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या कालावधीकरिता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून २३ मे २०२५ ते ०५ जून २०२५ या कालावधीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

हे पद तात्पुरत्या स्वरूपाचे असून, ११ महिन्यांसाठी आहे. मात्र, परिस्थितीनुसार या मुदतीत वाढ होऊ शकते. या पदासाठी मासिक वेतन रुपये ४५,०००/- निश्चित करण्यात आले असून, याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (सामाजिक शास्त्र किंवा आपत्ती व्यवस्थापन) असणे आवश्यक आहे.तसेच, ३ वर्षांचा अनुभव बंधनकारक आहे, ज्यापैकी किमान २ वर्षांचा अनुभव आपत्ती व्यवस्थापनातील असावा. मराठी आणि इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान, टिपणी लेखन आणि अहवाल लेखनात विशेष प्राविण्य आवश्यक आहे. शासकीय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे
• अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या शासकीय स्व-साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे:

• किमान शैक्षणिक अर्हता आणि त्यावरील शैक्षणिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र.

• शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला.

• ३ वर्षांचा अनुभव, त्यातील किमान २ वर्षांचा अनुभव आपत्ती व्यवस्थापनातील असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

• शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र.

• प्रकल्प हाताळण्याचा पूर्वानुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र.

• महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र.

• लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.

निवड प्रक्रिया
निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने रुजू होणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द होईल. तसेच, चारित्र्य पडताळणी अहवाल असमाधानकारक आढळल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, तो अद्ययावत करणे आणि कार्यशाळा आयोजित करणे.

• नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीपूर्वी, आपत्तीदरम्यान आणि आपत्तीनंतर करावयाच्या उपाययोजनांचे संनियंत्रण करणे.

• आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत संस्थांचे प्रशिक्षण, इस्पितळांची सज्जता सुनिश्चित करणे.

• प्रशासन, अभियंते, डॉक्टर, विद्यार्थी, शिक्षक इत्यादींचे प्रशिक्षण व सक्षमीकरण करणे.

• रोड शो, लोकगीते, पथनाट्ये, जाहिरात फलक यांसारख्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.

• जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार कामकाज करणे.

अर्ज करण्याची पद्धत
अर्जाचा नमुना पीडीएफ जाहिरातीमध्ये सर्वात खाली दिलेला आहे. उमेदवारांनी A-4 साईजच्या पांढऱ्या कागदावर हस्तलिखित अर्ज तयार करून मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड – ४३११२२ या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष आवक-जावक शाखेत २३ मे २०२५ ते ०५ जून २०२५ या काळात सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) सादर करावा. अर्जाच्या पाकिटावर पदाचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. या भरतीची जाहिरात आणि अर्जाचा नमुना www.beed.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की बीड जिल्हा कार्यालयात नोकरी निघालेल्या यासाठी पगार किती असणारे याची माहिती आपण घेतली आहे आमचे लेटेस्ट अपडेटसाठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment