WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ATM Chargers Rules ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे लागणार बँकेने नियम बदलले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ATM Chargers Rules आज आपण पाहणार आहोत की राज्यातील एटीएम मधून जर आपल्याला पैसे काढायचे असतील तर आता आपल्याला पैसे काढण्यासाठी देखील पैसे लागणार आहेत बँकेने काही नियम बदललेले आहेत याविषयी आपण आता संपूर्ण माहिती पाहणार आहोत राज्यातील एटीएम धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर बघूयात संपूर्ण माहिती.

ATM Chargers Rules पूर्ण माहिती

राज्यातील एटीएम धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे एटीएम बाबत आता काही नियम बदललेले आहेत प्रत्येक जण आता डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे वापरत असतो एटीएम कार्डचा उपयोग करून माणसाला जेव्हा हवे तेवढे पैसे काढता येतात आणि कुठल्याही क्षणी त्याला कुठली अडचण नाहीता एटीएम मधून सहजरीत्या पैसे त्याला काढता येतात परंतु तुम्हाला माहिती आहे का आता एटीएम च्या पैसे काढण्यासंदर्भात बँकेने काही नियम बदल केलेले आहेत हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण तुम्ही जर एटीएम वापरत असाल तर तुम्हाला आता त्याची माहिती असणं गरजेचं आहे तर बघूया की आपण काही नियम बदललेले आहेत आणि कोणत्या एटीएम धारकांना पैसे लागणार आहेत पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या संपूर्ण माहिती

ATM Chargers Rules: एटीएम युजर्सना १ मे पासून थोडे जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) एटीएम इंटरचेंज शुल्क वाढीला मंजुरी दिली आहे. म्हणजेच जर तुम्ही एटीएममधून पैसे काढले किंवा तुमच्या बँकेव्यतिरिक्त इतर बँकेचा बॅलन्स चेक केला तर तुमच्याकडून जास्त शुल्क आकारलं जाईल. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सच्या सांगण्यावरून आणि आरबीआयच्या मंजुरीनंतर हा बदल होणार आहे.

१ मेपासून एटीएम वापरण्याच्या शुल्कात वाढ होणार आहे. रोख रक्कम काढण्याचे शुल्क १७ रुपयांवरून १९ रुपयांपर्यंत वाढणार आहे. बॅलन्स चेकिंग चार्ज ६ रुपयांवरून ७ रुपयांपर्यंत वाढणार आहे. महिन्यात फ्री लिमिट संपल्यावर हे शुल्क आकारलं जाईल. मेट्रो शहरांमध्ये पाच आणि बिगर मेट्रो शहरांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारांना परवानगी आहे.

का केली वाढ?
आरबीआयच्या मंजुरीनंतर ही वाढ करण्यात आली आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) प्रस्तावावर आधारित आहे. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर शुल्क वाढीसाठी दबाव टाकत होते. जुन्या फीमुळे वाढता खर्च भागविण अवघड होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

छोट्या बँकांवर अधिक परिणाम
याचा मोठा परिणाम छोट्या बँकांवर होणार आहे. कारण त्यांच्या मर्यादित एटीएम नेटवर्कमुळे ते इतर बँकांच्या एटीएमवर अधिक अवलंबून आहेत. इंटरचेंज फी वाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. इंटरचेंज फी ही अशी रक्कम आहे जी ग्राहक दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरतो तेव्हा त्यांची बँक दुसऱ्या बँकेला देते. ओव्हरचार्ज होऊ नये म्हणून एटीएमचा जास्त वापर करणारे लोक आपल्या बँकेच्या एटीएमचा वापर करू शकतात. ते डिजिटल पेमेंट पद्धतीदेखील अवलंबू शकतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील एटीएम धारकांना आता पैसे काढण्यासाठी पैसे लागणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment