Anudan yojana pik आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाहीये कशामुळे त्यांना मिळणार नाही यासाठी त्यांना काय करावे लागेल याविषयी आपण माहिती बघणार आहोत पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारे याविषयी सरकारने काही माहिती दिलेली आहे बघुयात संपूर्ण माहिती
Anudan yojana pik संपूर्ण माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार राज्य सरकार नेहमीच अनुदान देत असतं कारण राज्यातील शेतकरी हे सर्व स्तंभ आपल्या देशाच्या राज्याच्या प्रगतीच्या आर्थिक प्रगतीच्या सर्वात मोठे हिसदार असतात त्यांच्यामुळेच आपला देश विकसित होत आहे या शेतकऱ्यांना नेहमीच हवामानाचा फटका बसत असतो त्यामुळे शेतकरी वर्ग ला नेहमीच अनुदान देणे पिक विमा देणे या सर्व गोष्टी राज्य सरकार केंद्र सरकार पार पडत असतात परंतु आता पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही कशामुळे त्यांना काय करावे लागेल याविषयी माहिती पाहूयात
Anudan yojana pik राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मृग बहार हंगामासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी यावर्षीपासून अर्ज करण्याच्या अटींमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. अर्जदार शेतकऱ्यांकडे ‘Farmer ID’ म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक असणे आता सक्तीचे करण्यात आले आहे.भारतीय कृषि विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स, फ्युचर जनरली आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार प्रमुख विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे.
प्रत्येक फळपिकासाठी अर्जाची अंतिम तारीख वेगवेगळी असून, यासंदर्भात स्थानिक कृषी विभागाकडून माहिती दिली जाईल. परंतु अर्ज करताना ‘Farmer ID’ नसल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
Farmer ID’ हा शेतकऱ्याचा अधिकृत ओळख क्रमांक आहे, जो कृषी विभागाच्या ‘अॅग्रिस्टॅक’ प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून मिळतो. हा क्रमांक शेतकऱ्यांची शाश्वत ओळख तयार करतो आणि शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरला जातो.
राज्यात सध्या जवळपास 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अनेक शेतकरी अद्यापही यापासून वंचित आहेत. त्यामुळे सरकारने यावर्षीपासून शेतकऱ्यांसाठी ‘Farmer ID’ अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
खरीप हंगामातही लागेल ओळख क्रमांक
हा नवीन नियम केवळ फळपिक विम्यापुरता मर्यादित नाही. याचप्रमाणे खरीप हंगामातील सर्व पीक विमा योजनांसाठीसुद्धा ‘Farmer ID’ आवश्यक असणार आहे. शेतकऱ्यांकडे जर हा क्रमांक नसेल, तर कोणत्याही प्रकारच्या कृषी योजनांचा लाभ त्यांना मिळणार नाही.
शेतकऱ्यांसाठी सूचना
आपल्या गावाच्या कृषी सहायक अधिकारी, तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ‘अॅग्रिस्टॅक’ प्रणालीद्वारे नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर मिळणारा ‘Farmer ID’ सुरक्षित ठेवा. विमा अर्ज करण्याआधी आपला ID नंबर तपासून खात्री करा.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ‘Farmer ID’ तयार करावा, जेणेकरून फळपिकांसह सर्व कृषी योजनांचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळवता येईल,” असं आवाहन देखील कृषी विभागातर्फे करण्यात आलं आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे याविषयी माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा