Aadhar card new update आज आपण पाहणार आहोत की आधार कार्ड संबंधित सरकारने कोणते नियम बदलले आहेत यामुळेच आपल्याला फायदा होणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत यासाठी आपल्याला काय करावे लागेल आधार कार्ड आपल्याला कशाप्रकारे अपडेट करावे लागेल आणि कोणते अशी नियम आहेत ज्यामुळे आपल्याला काही फायदा होणार आहे बघुयात संपूर्ण सविस्तर माहिती
Aadhar card new update पूर्ण माहिती
आधार कार्ड म्हणजे सर्वसामान्यांचा एक महत्त्वाचा पुरावा आहे आधार कार्ड हा आपण भारतातील रहिवासी असल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे आधार कार्ड म्हणजे आपली ओळख आहे मी आधार कार्डवर कितीतरी शासकीय योजना आपल्याला मिळत असतात कुठे आपल्याला तिकीट काढायचे असेल कुठे बँकेत अकाउंट ओपन करायचा असेल कुठे आणखीन कुठले सरकारी कामे करायचे असतील तर आधार कार्ड लागतं आता या आधार कार्ड संबंधित सरकारने आणखीन एक महत्त्वाचा नियम बदललेला आहे त्यामुळे सर्व सामान्य लोकांना याचा सर्वोत्तम फायदा होणार आहे बघुयत पूर्ण माहिती.
Aadhar card new update केंद्र सरकारनं आधार कार्ड पडताळणीच्या नियमात मोठा बदल केला आहे. सरकार खासगी कंपन्यांना मोबाईल अॅप्समध्ये आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनशी जोडण्यास मंजुरी दिली आहे. यामुळं सर्वसामान्यांना विविध सेवांचा लाभ घेण्यात फायदा होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं यासाठी (swik.meity.gov.in) नावानं एक नवं पोर्टल देखील लाँच केलं आहे. याचा उद्देश सरकारी आणि अशासकीय संस्थांना आधार पडताळणीची सुविधा देण्याचा आहे. यामुळं लोकांना अधिक सुविधा मिळतील. या पोर्टलद्वारे कोणतीही पात्र संस्था पडताळणीसाठी अर्ज करु शकते. मंजुरीनंतर आधार पडताळणीची प्रक्रिया त्यांना उपलब्ध होईल.
आधार कार्ड भारत सरकारद्वारे नागरिकांना देण्यात आलेलं विशेष ओळखपत्र आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आधार कार्ड ऐच्छिकआहे. पण, काही सरकार योजनांसाठी त्याचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
यूआयडीएआयं आधार पडताळणीसाठी फेस ऑथेंटिकेशन आणि ओटीपी सुरु केले आहेत. सरकारनं आधार कायद्यामध्ये दुरुस्ती करुन खासगी कंपन्यांना आधार ऑथेंटिकेशनची सुविधा देण्यास मंजुरी दिली आहे. याचा वापर पहिल्यांदा सरकारी विभाग करायचे. 31 जानेवारी 2025 ला करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हॉस्पिटलिटी, आरोग्य, ई-कॉमर्स, शिक्षण, क्रेडिट रेटिंग सारख्या सेवांसाठी आधार पडताळणी सोपी होईल.
यामुळं ग्राहकांना ई केवायसी, परीक्षा नोंदणी यासह इतर सेवांसाठी अनेकदा कागदपत्र द्यावी लागणार नाहीत. कर्मचाऱ्यांची हजेरी, ग्राहकांची पडताळणी सोपी होईल. यामुळं कुठेही, कधीही फेस ऑथेंटिकेशन सेवा उपलब्ध होईल. यूआयडीएआयनं आधार कार्ड सोबत वर्च्युअल आयडी देखील जारी केले आहेत. ज्यामुळं आधार नंबर शेअर न करता पडताळणी केली जाऊ शकते
अशाप्रकारे आपण पाहिलं की आधार कार्ड संबंधित सरकारने कोणते नियम बदललेले आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा