Aadhaar NewApp आज आपण पाहणार आहोत की आधार कार्ड धारकांसाठी कोणती महत्त्वाची आनंदाची बातमी आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत आधार कार्ड विषयी सरकारने आता नवीन अपडेट घेऊन आलेले आहे त्यामुळे आधार कार्डधारकांना आता याचा वापर सुलभरीत्या करता येणार आहे आणि याबद्दल आता माहिती आपण आज देणार आहोत आधार कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी अपडेट आलेले आहेत बघूयात संपूर्ण माहिती
Aadhaar NewApp संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे आधार कार्ड विषय आता एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर बघा आधार कार्ड हा आपला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा पुरावा मानला जातो आधार कार्ड एक प्रकारे आपल्याला आधार देतो कुठलेही सरकारी योजना असतील त्याचप्रमाणे आपल्याला कुठे फॉर्म भरायचे असतील कुठे ऍडमिशन करायचं असेल कुठले कागदपत्र काढायचे असतील म्हणजे आपल्याला राज्यामध्ये देशांमध्ये कुठे जायचं असेल एवढेच काय आपल्याला तिकीट जरी करायचे असतील तरी आपल्याला आधार कार्ड लागतं तर आधार कार्ड हे आपलं एकदम महत्त्वाचा पुरावा आहे आपला राष्ट्रीय तत्व भारत आहे याचा तो सर्वात मोठा पुरावा आहे आता या आधार कार्ड विषयी सुरक्षिता बाळगण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आधार कार्ड धारकांची चिंता आता मिटलेली आहे आणि कोणता निर्णय बघुयात संपूर्ण माहिती
Aadhaar NewApp आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. आधार कार्डचा उपयोग आज प्रत्येक कामासाठी होतो. मात्र, आता तुम्हाला फिजिकल कॉपी स्वरुपात आधार कार्डचा वापर करायचा नसल्यास मोबाइल अॅपद्वारे आधारचा वापर करता येणार आहे. सरकारने नुकतंच आधार अॅप लॉंच करण्याची घोषणा केली आहे. या अॅपचा वापर करणे अगदी यूपीआय अॅपवर पेमेंट करण्याइतके सोपे असणार आहे. लोकांना अगदी सहजरित्या या अॅपचा वापर करता यावा, अशाच पद्धतीने हे अॅप डिझाईन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे अॅप लॉंच केले. या अॅपमध्ये स्मार्टफोनद्वारे नागरिकांना आधार-आधारित डिजिटल सेवा प्रदान केली जाणार आहे, त्यासाठी फेस रेकॉगनायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे.
हे अॅप तयार करताना वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे. आधार कार्डद्वारे होणारी फसवणूक, माहितीमध्ये बदल आणि त्याचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. काय आहे नवीन आधार अॅप? त्याचा नागरिकांना काय आणि कसा फायदा होणार? या अॅपचा वापर नागरिकांना कधीपासून करता येणार? त्याची वैशिष्ट्ये काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
काय आहे ‘आधार अॅप’?
१. या अॅपमध्ये ओळख तपासणीसाठी क्यूआर कोडद्वारे आणि रिअल-टाइम फेस रेकॉगनायझेशनचा वापर केला जाणार आहे.
२. प्रवास करताना, हॉटेलमध्ये तपासणी करताना किंवा इतर कामांसाठी आधारसंबंधित माहितीची पडताळणी करण्यासाठी फिजिकल आधार कार्ड बाळगण्याची किंवा त्याची प्रत बरोबर ठेवण्याची गरज भासणार नाही.
३. फेस रेकॉगनायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मोबाइल डिव्हाइसवर आधार-आधारित डिजिटल सेवेचा लाभ घेता येईल.
४. आधार कार्डची फिजिकल कॉपी सादर करण्याऐवजी या ॲपद्वारे कोणतीही व्यक्ती क्यूआर कोड स्कॅन करून त्यांच्या आधारसंबंधित माहितीची पडताळणी करू शकतील.
५. नवीन ॲप वापरकर्त्यांना केवळ आवश्यक माहिती शेअर करावी लागेल, त्यामुळे वैयक्तिक डेटा उघड होणार नाही हे सुनिश्चित केले जाईल.
६. संपूर्ण भारतात ज्याप्रमाणे क्यूआर कोड वापरून यूपीआयचा वापर केला जातो, अगदी त्याचप्रमाणे आधार पडताळणी करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. हेच या ॲपचे प्रमुख वैशिष्ट्यदेखील आहे.
७. लोकांना ॲप वापरून केवळ क्यूआर कोड स्कॅन करावे लागेल आणि त्यांची ओळख फेशियल रेकॉगनायझेशनद्वारे निश्चित केली जाईल. मुख्य म्हणजे हे ओळखपत्र कागदी प्रतऐवजी वापरकर्ते स्वतःच्या फोनवरून सुरक्षितपणे पाठवू शकतील.
८. या ॲपमुळे आधार कार्डमधील माहितीचा अनधिकृत वापर रोखण्यास मदत होईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
९. हे ॲप युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) च्या देखरेखीखाली विकसित केले गेले आहे
१०. हे ॲप पूर्णपणे डिजिटल आणि सुरक्षित आहे. मुख्य म्हणजे, केवळ वापरकर्त्याच्या परवानगीनेच हे ॲप वापरता येईल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
वापरकर्त्यांसाठी ते कधी उपलब्ध होईल?
नवीन आधार ॲप अर्ली ॲक्सेस फॉरमॅटमध्ये लाँच केले जात आहे. सुरुवातीला काही मर्यादित लोकांना याचा वापर करता येईल. या लोकांमध्ये आधार संवाद कार्यक्रमासाठी नोंदणी केलेल्यांचा समावेश असेल. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले आहे की, यामुळे वापरकर्ते आणि भागीदार दोघांकडून अभिप्राय घेता येईल, ज्याचा वापर लाँचपूर्वी केला जाईल. या अभिप्रायाच्या आधारे यूआयडीएआय लवकरच हे ॲप सर्वांसाठी उपलब्ध करून देईल,” असे ‘यूआयडीएआय’ने एका निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, या ॲपचे डिजिटल पडताळणी वैशिष्ट्यांसह अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे फिजिकल आधार कार्ड बाळगण्याची गरज संपणार आहे. अनेकदा हे आधार कार्ड हरवण्याची, चोरीला जाण्याची शक्यता असते, ज्यामुळे अनेकदा याचा गैरवापरदेखील केला जातो. या ॲपमुळे फसवणूक किंवा डुप्लिकेशनची शक्यता कमी होते. ‘यूआयडीएआय’ अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, आधार फेस ऑथेंटिकेशन सिस्टम आधीच वापरात आहे.
नवीन आधार अॅपचा फायदा
आधार अॅपमुळे वापरकर्त्यांना प्रवास, हॉटेल चेक-इन किंवा अगदी काही खरेदी करताना प्रत्यक्ष आधार कार्ड बाळगण्याची किंवा त्याची प्रत देण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांच्या आधारच्या प्रत्यक्ष प्रती दाखवण्याऐवजी, नवीन अॅपद्वारे क्युआर कोड स्कॅन करून ओळख पडताळणी केली जाईल. फेस आयडी-आधारित प्रमाणीकरणाव्यतिरिक्त, नवीन आधार ॲप QR कोड पडताळणी वैशिष्ट्यदेखील प्रदान करेल, ज्यामुळे आधार पडताळणी जलद आणि अधिक कार्यक्षम होईल. याद्वारे आधार सुरक्षितपणे एखाद्या व्यक्तीच्या फोनवरून थेट शेअर करता येईल. हे अॅप पूर्णपणे डिजिटल असल्यामुळे चांगला इंटरनेट स्पीड आवश्यक असेल. सायबर फसवणुकीपासूनदेखील संरक्षण मिळेल, कारण तुमची वैयक्तिक माहिती कोणाच्या हाती लागणार नाही,हे अॅपद्वारे सुनिश्चित केले जाईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की आधार कार्ड विषय सरकारने कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
500 handred rules gas sclander
Kab dogaa