8july holiday आज आपण पाहणार की राज्यातील शाळांना उद्या सुट्टी असणार का नेमक्या कोणत्या कारणामुळे उद्या परवा सुट्टी असणार आहे विद्यार्थी बालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर याविषयी आपण संपूर्ण माहिती बघुयात नेमके कोणत्या कारणामुळे ही सुट्टी असणार आहे
8july holiday संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे. तुम्हाला माहित असेल की राज्यातील शाळा या जून पासून सुरू झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला रविवार वळत असताना सुट्टीला सुट्टी असतात परंतु आता मध्ये 8 आणि नऊ जुलैला देखील सुट्टी असण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे या का कारण आहे की आठ नऊ जुलैला ही सुट्टी असणार आहे या मागचं मोठं कारण म्हणजे विनाअनुदानित ज्या शाळा आहे त्यांच्या काही मागणं आहेत त्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झालेले आहेत नेमकी काय शक्यता आहे भगव्यात माहिती
8july holiday महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनामुळे दोन दिवस शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून अनुदानाचा मुद्दा प्रलंबित आहे. गेल्या वर्षी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्रात सलग 75 दिवस विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. या आंदोलनांची दखल घेत सरकारने त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु प्रलंबित अनुदान आणि आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे.
राज्यात झालेल्या 75 दिवसांच्या आंदोलनानंतर 10 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र 14 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेल्या सरकारी आदेशात (GR) अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसाठी निधीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा निराशा पसरली.
एक वर्षांहून अधिक काळ उलटूनही शिक्क आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागणीकडे सरकारने अद्यापही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आश्वासने देऊनही त्यांची पूर्तता न झाल्याने आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच कारणामुळे 8 आणि 9 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद ठेवून हजारो शिक्षक 8 आणि 9 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने, प्रशासनाला या विषयाची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शाळा कॉलेजला उद्या सुट्टी असणार का याविषयी माहिती बघितली आहे आय एम चा लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा