Jee free education आज आपण पाहणार की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना आता सरकारकडून ही गोष्ट मोफत मिळणार आहे त्यासाठी काय करावे लागेल आणि कोणती गोष्ट सरकारकडून मोफत मिळणार आहे याविषयी माहिती बघूया
Jee free education संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे ते म्हणजे तुम्ही जर आता तुमचा विद्यार्थी जे डबल इ मेडिकलची जी परीक्षा असते ती द्यायची असेल त्यासाठी बरोबर परीक्षण पैसे लागत असतात कोचिंग क्लासेस साठी तुम्हाला देखील माहित असेल परंतु आता ही परीक्षा देण्यासाठी सरकारकडून काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या मुलाला हीच परीक्षा देण्यासाठी जे कोचिंग आहे ते मोफत मिळू शकते यासाठी काय करायचं बघूयात माहिती
Jee free education आयआयटी आणि मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्गात जातात. यासाठी लाखो रुपयांचे शुल्कही आकारले जाते. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी पैशाच्या अभावी शिकवणी पासून वंचित असतात. अश्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे लाखो रुपये शुल्क वाचणार आहे. तसेच, जे विद्यार्थी हे प्रशिक्षण घेणार त्यांना महिन्याला सहा हजार रुपयाचे मासिक विद्यावेतन मिळणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईई – १०० व नीट – १०० जागांकरिता प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी इयत्ता अकरावी(विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा व अधिवास दाखला असावा. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या घरात असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी. जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नमुद केल्याप्रमाणे महिला ३० टक्के, दिव्यांग ५ टक्के, अनाथ १ टक्के, वंचित ५ टक्के जागा आरक्षित असतील.
प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणाचा कालावधी २४ महिन्यांचा असणार आहे. प्रशिक्षण काळात ७५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ६००० एवढे विद्यावेतन दिल्या जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रुपये ५००० एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० जुलै आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी https://cpetp.barti.in या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन महासंचालक बार्टी मार्फत करण्यात आले आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्या आनंदाची बातमी सरकारने काय निर्णय घेतला याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा