Sakhi vima yojana आज आपण पाहणार की राज्यातील महिलांना महिन्याला 7000 कसे मिळणार याविषयी माहिती बघणार आहोत नक्की कोणती योजना आहे कागदपत्र काय लागतील याविषयी आपण माहिती घेणार आहोत अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा आहे पात्रता काय आहे याची माहिती आपण घेऊ
Sakhi vima yojana संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी राज्यातील महिलांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार तुम्हाला माहीत असेल नवीन नवीन योजना आणत असतात त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता जवळपास नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना महिलांना 7000 मिळणार आहेत कोणती योजना आहे आणि काय आपल्याला करावे लागेल त्यामुळे 7000 रुपये आपल्या खात्यात जमा होतील याविषयी माहिती बघूया
Sakhi vima yojana केंद्र सरकारकडून महिला सक्षमीकरासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजना रांगेतल्या शेवट्या महिलेपर्यंत पोहोचावी यासाठी कृतीकार्यक्रमही सरकारकडून राबवला जातोय. दरम्यान, सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विमा साखी (Bima Sakhi Yojana) नावाची योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकणार आहे. महिलांना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये सोबतच कमीशन मिळू शकतं. याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे? या योजनेतून महिलांना नेमके किती रुपये मिळू शकतात? हे जाणून घेऊ या….
विमा सखी ही एलआयसीची एक योजना आहे. फक्त महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत तीन वर्षे महिलांना स्टायपेंड मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण तीन वर्षे ट्रेनिंग दिलं जाईल. या काळात महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकणार आहेत. ज्या महिलांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही काम करता येईल.
विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय आहेत?
महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित महिलेचे कमीत कमी इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असायला हवे. तसेच महिलेचे वय कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 70 वर्षे असायला हवे. तीन वर्षांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येईल.
विमा सखींना नेमके किती पैसे दिले जातील?
या योजनेच्या माध्यमातून ट्रेनिंग घेणाऱ्या महिलांना सरकारकडून स्टायपेंड दिले जाईल. या तीन वर्षाच्या काळात महिलांना दोन लाख रुपये दिले जातील. ट्रेनिंग घेणार्या महिलांना पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला 7000 रुपये दिले जातील. दुसऱ्या वर्षी 6000 तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये दिले जातील. विशेष म्हणजे यामध्ये कमीशनचा समावेश नाही. कमीशनच्या रुपात तुम्हाला मिळणारे पैसे हे वेगळे असतील.
नेमकी अट काय आहे?
पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मिळणारे अनुक्रमे 6000 आणि 5000 रुपये मिळण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. पहिल्या वर्षी तुम्ही जेवढ्या पॉलीसी काढून दिल्यात त्यापैकी साधारण 65 टक्के योजना या दुसऱ्या वर्षीही चालूच असायला हव्यात. तसे असेल तरच तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे पैसे मिळतील. तुम्हाला
https://licindia.in/test2 या लिंकवर विमा सखी योजनेची सर्व माहिती मिळेल.
अशाप्रकारे आपण पहिले राज्यातील महिलांना जवळपास महिन्याला 7000 मिळणार आहेत याची माहिती असून घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9321515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्लेस्टोर वरून डाउनलोड करा