Holiday schedule 2025 आज आपण पाहणार की शाळा कॉलेज यावर्षीच्या सुट्ट्या किती असणार आहेत कोणत्या तारखेला असणार आहेत नेमक्या कधीपासून सुरू होतील वर्षभरात बघुयात पूर्ण माहिती
Holiday schedule 2025 संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झालेले आहेत आता यावर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेला आहे जून महिन्यापासून तर आता तुम्हाला माहिती आहे का यावर्षी पूर्ण सुट्ट्या किती असतील कोणत्या सणाला असतील आणि एकूण किती सुट्ट्या आहेत त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांचा यांना नियोजन करता येईल आणि आपण सुट्ट्या घेऊ शकतात तर या विषयावर माहिती बघणार आहोत पूर्ण
Holiday schedule 2025 शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा एक निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील शाळांची वर्षभरातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शाळा विद्यार्थ्यांना ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या असणार आहेत. यामध्ये दीवाळीच्या १० दिवस ( १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) आणि उन्हाळ्याच्या ३८ दिवस (२ मे ते १३ जूनपर्यंत) सुट्या असणार आहेत. अशा सर्व मिळून वर्षभरात १२८ दिवस सुट्ट्या आहेत.
गावच्या यात्रेचा अपवाद वगळता सलग तीन दिवस शाळा बंद राहणार नाहीत, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. स्थानिक परिस्थितीनुसार यादीतील तारखेला तो सण येत नसल्यास मुख्याध्यापकांनी सुटी घेण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने गटशिक्षणाधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे. मुख्याध्यापक अधिकारात सुटी घेताना संबधित मुख्याध्यापकांनी तीन दिवस अगोदर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी कळविणे बंधनकारक असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच अशी असणार आहे. अर्ध्यावेळेची शाळा सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत भरेल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेच्या कामकाजादिवशी ६० मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १० मिनिटांच्या दोन सुट्या राहतील. दुबार पद्धतीने शाळा भरत असल्यास दहा मिनिटांची लहान आणि ३५ मिनिटांची मोठी सुटी असणार आहे.
वर्षभरातील सार्वजनिक सुट्या
जुलै : आषाढी एकदाशी, मोहरम, नागपंचमी (२ दिवस)
ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी (३ दिवस)
सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना (४ दिवस)
ऑक्टोबर : गांधी जयंती (दसरा) व दिवाळी सुटी (११ दिवस)
नोव्हेंबर : गुरूनानक जयंती (१ दिवस)
डिसेंबर : ख्रिसमस – नाताळ (१ दिवस)
जानेवारी : मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन (३ दिवस)
फेब्रुवारी : शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (३ दिवस)
मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती (६ दिवस)
एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (२ दिवस)
मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुटी (२७ दिवस)
जून : उन्हाळा सुटी : (१२ दिवस)
जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक अधिकारातील सुटी : (२ दिवस)
वर्षभरातील ५२ रविवार
अशाप्रकारे आपण बघितलं की यावर्षी विद्यार्थी शिक्षकांना वर्षभरात किती सुट्टी असणार आहे त्याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा