WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank July rules 1 जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये मोठा बदल नागरिकांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank July rules आज आपण पाहणार आहोत की एक जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये कोणता मोठा बदल होणार आहे याचा काही परिणाम होईल याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत नेमके कोणत्या नियमात बदल होईल आणि याचा आपल्याला काय परिणाम होणार बघूयात काय माहिती आहे

Bank July rules संपूर्ण माहिती.

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आपल्या प्रत्येकाची कुठल्या ना कुठल्या बँकेत खाते असतील या बँकेच्या खातेनुसार नियमानुसार आपले खाते चालत असतात याच्यात सेविंग दर असेल व्याजदर असेल एफबीचा दर असेल म्युच्युअल फंडचा दर असेल हे सर्व काही गोष्टी नियमानुसार जगत असतात यामध्ये प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बदल होत असतात घराचा लोन गाडीचा लोन रेपो रेट कमी जास्त होणे तर बघूया की नेमकं काय बदल होणार आहे

Bank July rules खासगी क्षेत्रातील बँकांच्या दृष्टीने एक महत्वाची बाती आहे. खासगी बँकांच्या संदर्भातील काही नियम 1 जुलैपासून बदलणार आहेत. एकीकडे, एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डबाबत काही नियम बदलले आहेत, तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेने काही व्यवहारांवर आकारले जाणारे शुल्कही बदलले आहे. ते नेमके कोणते बदल आहेत?  त्याचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

एचडीएफसी बँकेच्या नियमांमध्ये बदल
जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करुन एमपीएल, ड्रीम 11 सारख्या गेमिंग अॅप्सवर दरमहा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला त्यावर एक टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही मोबिक्विक, पेटीएम, ओला मनी आणि फ्रीचार्ज सारख्या थर्ड पार्टी वॉलेटवर महिन्यात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवले तर त्यावरही एक टक्के शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही इंधनावर 15 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर अतिरिक्त एक टक्के शुल्क भरावे लागेल. याशिवाय, जर तुम्ही वीज, पाणी आणि गॅसवर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले तर त्यावरही एक टक्के शुल्क भरावे लागेल.

ICICI बँकेच्या नियमांमध्ये बदल
खासगी क्षेत्रातील आणखी एका मोठ्या बँकेने ICICI बँकेने IMPS आणि ATM वर आकारण्यात येणाऱ्या काही शुल्कात बदल केले आहेत. यानंतर, जर तुम्ही आता इतर कोणत्याही बँकेचा वापर केला तर तुम्हाला त्यावर काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. म्हणजेच, मेट्रो शहरांमध्ये, तुम्हाला दरमहा तीन मोफत व्यवहार मिळतील. तर लहान शहरांमध्ये, तुम्हाला पाच पर्यंत मोफत व्यवहार दिले जातील. यानंतर, जिथे पूर्वी पैसे काढण्यासाठी 21 रुपये आकारले जात होते, तिथे आता तुम्हाला 23 रुपये शुल्क द्यावे लागेल. जर तुम्ही फक्त शिल्लक तपासली किंवा आर्थिक नसलेले काम केले तर त्यावर प्रति व्यवहार 8.5 रुपये शुल्क आकारले जाईल.

याशिवाय, आता IMPS द्वारे पैसे पाठवण्यासाठी म्हणजेच त्वरित सेवेसाठी तुम्हाला तुमच्या व्यवहारानुसार शुल्क भरावे लागेल. जसे की 1 हजार रुपयांसाठी प्रति व्यवहार 2.5 रुपये, तर 1 हजार ते 1 लाख रुपयांसाठी प्रति व्यवहार 5 रुपये. तर 1 लाख ते 5 लाख रुपयांसाठी प्रति व्यवहार 15 रुपये द्यावे लागतील.

अशाप्रकारे आपण पाहिलं की बँकेच्या नियमामध्ये काय बदल होणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment