WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat jamin shetakari या शेतकऱ्यांना सरकारकडून मोफत जमीन मिळणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat jamin shetakari आज आपण पाहणार की राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोफत जमीन मिळणार आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना ही मोफत जमीन मिळणार कशामुळे मिळणार कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार त्यासाठी त्यांना काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात.

Mofat jamin shetakari संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोफत जमीन मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कशामुळे मिळणार आहे शेतकऱ्याला जमीन म्हणजे एक महत्त्वाचं वरदान असतं कारण या जमिनीवर ते शेतकरी आपले पीक घेत असतात आणि त्याच्यातून उत्पन्न निर्माण करत असतात आणि त्यांचा उदरनिर्वाह होत असतो तर तुम्हाला माहिती आहे का ना काही शेतकऱ्यांना मोफत जमीन सरकारकडून मिळणार आहे नेमकी कोणती जमीन आणि कशामुळे त्यांना मिळणार आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत

Mofat jamin shetakari राज्य शासनाचा शेतसारा न भरल्यामुळे सरकार जमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकरी /मालकांना देण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने अद्यादेश जारी केला आहे. राज्यात सुमारे पाच हजार एकर आकारी पड जमीनी आहेत.

त्याचा लाभ राज्यातील एक दीड हजाराहून अधिक शेतक-यांना मिळणार आहे. या पाच हजार एकरांपैकी पुणे विभागात 597 एकर जमीनी आहेत. दरम्यान जमिनीच्या प्रचलित बाजारमूल्याच्या पाच टक्के शुल्क आकारून जमिनी परत देण्यात येणार आहेतमंत्रीमडळाच्या मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत आकारी पड जमीनी मूळ शेतकरी /मालक अगर त्यांच्या वारसांना देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार याबाबतचा अध्यादेश प्रसिध्द झाला नव्हता. मात्र आता तो प्रसिध्द झाला आहे.

त्यानुसार या आकारीपड जमीनीबाबतचा ताबा संबधितांना देण्यात येणार आहे. अर्थात या आकारीपड जमिनीसाठी नजरणा भरणे बंधनकारक केले आहे. सर्व कार्यवाही शासनाच्यावतीने पूर्ण केली तरी त्या जमीनी दहा वर्षे संबधितांना विकता येणार नाहीत. असे शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

आकारी पड जमीन म्हणजे?
शेतजमीन मालकांनी शेतसारा, तगाई, कर्ज, न भरल्याने अशा जमिनीच्या सात-बारा उतार्‍यावर सरकारने मालकी हक्क लावला. मात्र, या जमिनी मूळ मालकाकडेच ठेवण्यात आल्या. त्यामुळे जमिनी मालकाची वहिवाट असली, तरी या जमिनीच्या सात-बारा उतार्‍यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारीपड जमिनी म्हणून म्हटले जाते.
राज्य शासनाच्या महसूल विभागाचे कार्यासन अधिकारी मोहसिन शेख यांनी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

अशी आहे नियमावली
आकारीपड जमिनी शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास निर्बंध या अटीवर असल्याने या जमिनीची भोगवटादार सदरी वर्ग 2 अशी नोंद घेतली जाणार आहे.
जमीन दिल्यानंतर 10 वर्षे हस्तांतरण अथवा विक्री करण्यास परवानगी नाही10 वर्षांच्या कालावधीनंतर शासनाच्या पूर्वमान्येतेने या जमिनी विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करण्यात येईल.

शेती करण्यासाठी ही जमीन दिली असल्याने पाच वर्षांपर्यंत अशा जमिनींचा वापर बिगरशेतीसाठी करता येणार नाही
आकारीपड जमीनीवर अतिक्रमणे केली असल्यास ती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तात्काळ काढण्यात येणार
कलम 220 नुसार आकारीपड म्हणून घोषित झलेल्या जमीनी शासकीय प्रकल्पासठी संपादित केलेल्या असतील तर त्या जमीनींचा मोबदला शेतकरी/मालक/ वारसदार यांना मिळणार नाही.

अशाप्रकारे आपण बघितलं की कोणत्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोफत जमीन मिळणारे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “Mofat jamin shetakari या शेतकऱ्यांना सरकारकडून मोफत जमीन मिळणार.”

Leave a Comment