PM E-Drive Yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर इलेक्ट्रिकल बाईक घेत असतात कुठलेही दोन चाकी तर यासाठी सरकार तुम्हाला पैसे देणार आहे यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे कागदपत्र कोणते लागतील त्याचप्रमाणे अर्ज कसा करावा लागेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत
PM E-Drive Yojana संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता सध्या तुम्ही बघत असाल की इलेक्ट्रिकल गाड्या ह्या भरपूर येत आहेत टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल आणि आधीच्या पेट्रोल डिझेलच्या गाड्या आता कमी होताना दिसत आहेत परंतु इलेक्ट्रिकल गाड्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार वेळोवेळी प्रयत्न करत आहे करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या देशातील पेट्रोल डिझेल ने होणारे प्रदूषण हे कमी करता येईल आणि नागरिकांना व्यवस्थित सोयी सुविधा पुरवता येतील यामुळे इलेक्ट्रिकल बाईक जर तुम्ही घेत असाल तर सरकारकडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत हो तुम्ही हे खरे ऐकता येत नेमक्या आता याच्यासाठी काय प्रोसेस आहे पात्रता काय असतील कागदपत्र काय असतील आणि आपल्याला किती पैसे मिळणार आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत कोणत्या योजनेद्वारे हे पैसे मिळणार आहेत बघूया संपूर्ण माहिती
PM E-Drive Yojana इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने पीए ई-ड्राइव्ह योजना सुरू केली. या अंतर्गत दुचाकी वाहन खरेदी करताना ग्राहकांना सरकारकडून अनुदान मिळते. देशातील विद्युत गतिशीलतेला प्रोत्साहन देणे, प्रदूषण कमी करणे आणि ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून तुम्हालाही रस्त्यांवर इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या वाढलेली दिसत असेल. आता सरकारने अलीकडेच या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदान प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ईव्ही अनुदान मिळण्यासाठी ४० दिवसांचा कालवधी लागत होता. आता फक्त ५ दिवसांत याचा लाभ मिळणार आहे.
पीएम ई-ड्राइव्ह योजना म्हणजे काय?
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ सप्टेंबर २०२४ रोजी ही योजना सुरू करण्यास मान्यता दिली होती. तर १ ऑक्टोबर २०२४ पासून ही योजना लागू झाली असून ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहील. १०,९०० कोटी रुपयांच्या बजेटची ही योजना प्रामुख्याने इलेक्ट्रिक दुचाकी, तीन चाकी वाहने, बस, ट्रक आणि रुग्णवाहिका यांसारख्या वाहनांना अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. २४.७९ लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि ३.१६ लाख ३ चाकी वाहनांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे.
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदान
पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत, इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीदारांना पहिल्या वर्षी १०,००० रुपये आणि दुसऱ्या वर्षी ५,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये ओला, एथर, टीव्हीएस आणि बजाज चेतक सारखे लोकप्रिय ब्रँड या योजनेअंतर्गत येतात.
पीएम ई-ड्राइव्ह योजनेचा लाभ कसा घ्यायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, प्रथम पीएम ई-ड्राइव्ह पोर्टलवर जा आणि ई-व्हाउचरसाठी अर्ज करा. आता पात्र ईव्ही खरेदी करा आणि ई-व्हाउचरवर सही करा. यासोबतच, डीलरसोबत पोर्टलवर ई-व्हाउचर अपलोड करा. ह्या सर्व गोष्टी अवघड वाटत असतील तर तुमची दुचाकी डीलरही या गोष्टी करुन घेतो. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील नागरिकांना जर इलेक्ट्रिकल बाईक घ्यायचे असेल तर किती पैसे मिळणार आहे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा