Post Office new Schemes आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे पोस्टाच्या या योजनेत पैसे डबल होतील याचीच माहिती आपण घेणार आहोत या योजनेसाठी आपल्याला काय करावे लागेल किती पैसे गुंतवे लागतील त्याचप्रमाणे कागदपत्र काय लागतील नेमकं या योजनेचा काय नाव आहे किती कालावधी असेल संपूर्ण माहिती आपण पाहूयात.
Post Office new Schemes पूर्ण माहिती
प्रत्येक जण आर्थिक गुंतवणूक करत असताना आर्थिक गुंतवणूक करताना त्याला सुरक्षित व्यवहार लागत असतात कारण वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या ठिकाणी लागू असतात पोस्टाच्या योजना बँकेच्या योजना त्याचप्रमाणे आणखीन काही सरकारी योजना असतात सर्व ठिकाणी आपण पैशांची गुंतवणूक करत असतो परंतु आपल्याला त्याला मोबदला चांगला मिळण्यासाठी आपल्याला एक चांगली योजना माहित पाहिजे आणि त्याचा मोबदला देखील आपल्याला कमी वेळेत चांगला मिळाला पाहिजे म्हणून लोक काही ठिकाणी शेअर मार्केटमध्ये पैसा लावतील काही ठिकाणी म्युचल फंड मध्ये पैसे लावतात परंतु तुम्हाला माहिती आहे का पोस्टाचे असे देखील एक योजना आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पैसा डबल टिबल चोपट देखील होऊ शकतो तर बघुयात आपण येथे संपूर्ण माहिती.
Post Office new Schemes गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवणे हे प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वप्न असते. मात्र, योग्य माहिती आणि नियोजनाच्या अभावामुळे अनेकजणांना सूर गवसत नाही. दुसरा गैरसमज असा की श्रीमंत होण्यासाठी खूप उत्पन्न असावे लागते. हे १०० टक्के खरं नाहीये. तुम्ही कमावलेला पैसा तुम्ही कसा? आणि कुठे गुंतवता हे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही शिस्तबद्ध गुंतवणूक केली तर कमी पैशातही तुम्ही कोट्याधीश होऊ शकतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा फॉर्म्युला सांगणार आहोत.
‘रुल ७२’
गुंतवणुकीच्या जगात ७२ चा नियम हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, यामध्ये तुमची गुंतवणूक किती दिवसात दुप्पट होईल याचं उत्तर तुम्हाला मिळेल. याशिवाय नियम ११४ आणि १४४ चे नियम देखील महत्त्वाचे आहेत, जे गुंतवणुकीसाठी अनुक्रमे तिप्पट आणि चौपट होण्याची वेळ सांगतात. गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी ‘रुल ७२’ हा एक सोपा नियम आहे. या नियमानुसार, गुंतवणुकीवरील वार्षिक व्याजदराने ७२ ला भागायचे. भागाकारात येणारी संख्या म्हणजे तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी. उदाहरणार्थ: जर तुम्हाला वार्षिक १४.४ टक्के व्याज मिळत असेल, तर ७२ ला १४.४ ने भागा. भागाकार ५ येईल. याचा अर्थ तुमची गुंतवणूक ५ वर्षात दुप्पट होईल.
गुंतवणुकीचे पर्यायः
• म्युच्युअल फंड : म्युच्युअल फंडात एसआयपी (SIP) द्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. दीर्घकालीन उद्धीष्ट ठेऊन जर तुम्ही गुंतवणूक केली तर जोखीम कमी होते.
• शेअर बाजारः शेअर बाजारात योग्य माहिती घेऊन गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो. पण, इथे जोखीम जास्त असल्याने तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
सरकारी योजनाः पोस्ट ऑफिसच्या योजना, किसान विकास पत्र यांसारख्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते.
११४ चा नियमः पैसे तिप्पट करण्याची वेळ त्याचप्रमाणे, तुमचे पैसे तिप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील हे जाणून घेण्यासाठी ११४ ला व्याजदराने विभाजित करा. उदाहरणः जर व्याजदर ८% असेल, तर ११४ + ८ = १४.२५ वर्षात तुमची गुंतवणूक तिप्पट होईल.
१४४ चा नियमः पैसे चौपट करण्याची वेळ गुंतवणूक चौपट कधी होईल हे जाणून घ्यायचे असल्यास, १४४ ला व्याजदराने विभाजित करा. उदाहरणः जर व्याज दर ८% असेल, तर त्याला चौपट होण्यासाठी लागणारा वेळ १४४ ८ = १८ वर्ष असेल.
७२, ११४ आणि १४४ चे नियम फायनान्सच्या जगात सोप्या आणि प्रभावी गणितासाठी खूप उपयुक्त आहेत. पण, लक्षात ठेवा ही एक अंदाजे पद्धत आहे. वास्तविक परतावा बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. योग्य गुंतवणुकीची योजना बनवण्यासाठी हे नियम लक्षात घेऊन निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनांमध्ये आपल्याला चांगला पैसा मिळणार आहे याचीच माहिती आपण पाहिले आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा