WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar Face Authentication process आता आधार कार्डची गरज नाही तुमचा चेहराच आधार कार्ड बनणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar Face Authentication process आज आपण पाहणार आहोत की आधार कार्ड संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आलेली आहे आता आधार कार्ड ची गरज आपल्याला असणार नाही कारण आपला चेहराच आपला आधार कार्ड बनणार आहे याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत यामुळे आपल्याला काय करावे लागेल काय फायदा होईल संपूर्ण माहिती बघूयात

Aadhaar Face Authentication process पूर्ण माहिती

देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी श्रीमंत असो गरीब असो सर्वांना एकच महत्त्वाचा पुरावा आपली ओळख सांगणारा आपलं राष्ट्रीय तत्व सांगणारा म्हणजे आधार कार्ड आता या आधार कार्ड ला आणखीन सुरक्षित करण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलत आहे सरकार सांगत आहे की आता आधार कार्ड ची गरज लागणार नाही तुम्हाला जिथे गरज लागेल तिथे तुमचा चेहरा हा स्कॅन होणार आणि तोच तुमच्या आधार कार्डची ओळख होणार याचा लाभ भरपूर होणार आहे मागच्या काही दिवसांमधून बाहेरएल देशातील लोक देखील आपल्या येथे बनावट आधार कार्ड घेऊन राहतात यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्याची संपूर्ण विश्लेषक माहिती आपण पाहूयात.

डिजिटल इंडियाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत भारत सरकार आता आपण आधार कार्डच्या त्रासातून जनतेची सुटका करणार आहे. सरकारकडून आता असे तत्रज्ञान विकसित केले जात आहे ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी आधार कार्ड दाखवण्याची गरज राहणार नाही. या तत्रज्ञानामुळे तुमचा चेहराच तुमचे ओळखपत्र बनणार आहे. देशातील नागरिकांची ओळख पडताळणी कोणत्याही कागदपत्राशिवाय फक्त फेस ऑथेंटिकेशनद्वारे करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. यामुळे अनेक प्रकारच्या सेवा जलद, सुरक्षित आणि सोप्या होण्यास मदत होईल.

आतापर्यंत आधार प्रमाणीकरण फक्त सरकारी सेवांपुरते मर्यादित होते. परंतु आता ही सुविधा खाजगी कंपन्यांनाही देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरणामुळे बँकिंग, प्रवास, विमा, आतिथ्य आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रातील सेवांचा लाभ घेणे सोपे होईल. यामुळे बनावट कागदपत्रांचा वापर रोखला जाईल आणि ग्राहकांचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि जलद होईल.

फसवणूक आणि बनावटगिरीला आळा
हे तंत्रज्ञान बनावट कागदपत्रांचा वापर आणि फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. चेहऱ्याची ओळख खोटी दाखवणे कठीण असेल. फसवणूक आणि बनावटगिरीला आळा बसेल. तसेच वृद्ध आणि निरक्षर लोकांसाठी ओटीपी लक्षात ठेवणे किंवा कागदपत्रे हाताळणे कठीण असते. अशा परिस्थितीत फेस ऑथेंटिकेशनमुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. ते फक्त कॅमेऱ्यासमोर त्यांचा चेहरा दाखवून त्यांच्या सेवा सहजपणे मिळवू शकतील.

आधार कार्ड जर आपली ओळख झाला तर नक्कीच याच्यामध्ये सुरक्षितता निर्माण होईल सध्या digital तयुगामध्ये काही तुम्हाला माहिती आहे की असुरक्षित व्यवहार होतात याला देखील आळा बसेल त्याचप्रमाणे आपल्याला नेहमी त्याला आपल्या सोबत बाळगण्याची गरज राहणार नाही आपले कामांमध्ये जरा सुरक्षित आणि तात्काळ कामे आपली होतील.

डेटा सुरक्षितता आणि गोपनीयता
UIDAI ची फेस ऑथेंटिकेशन सिस्टम पूर्णपणे सुरक्षित करण्यात आली आहे. वापरकर्त्याच्या संमतीशिवाय डेटाचा कुठेही गैरवापर केला जाणार नाही. त्यामुळे गोपनीयता राखली जाईल. सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान डिजिटल सेवांचा विस्तार करण्यास मदत करेल. या बदलामुळे डिजिटल इंडिया मोहिमेला आणखी बळकटी मिळेल आणि नागरिकांना अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा मिळतील.

अधिक जलत आणि त्रासमुक्त सेवा
आधार प्रमाणीकरणाचा हा नवीन प्रकार नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करेल. कारण यामुळे लांबलचक फाईल आणि कागदपत्रे हाताळण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजी कॅमेऱ्यासमोर फक्त तुमचा चेहरा दाखवून तुमची ओळख पडताळली जाईल. यामुळे सरकारी आणि खाजगी सेवा त्वरित उपलब्ध होतील. हॉटेल बुकिंग, विमान प्रवास, ट्रेन आरक्षण, आरोग्य सुविधा आणि बँकिंग सेवांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ओळखपत्र दाखवण्याची गरज भासणार नाही. केवळ चेहऱ्याच्या पडताळणीतूनच सर्व आवश्यक सेवांमध्ये त्वरित प्रवेश मिळेल.

तर अशाप्रकारे आपण पाहिलं की आधार कार्डची गरज का राहणार नाही याची संपूर्ण माहिती आपण बघितले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment