PM Kisan Yojana news पीएम किसान योजनेचा लाभ आता कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार
PM Kisan Yojana news आज आपण पाहणार आहोत की राज्यातील देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे आता कुटुंबातील कोणत्या व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे आणि काय महत्त्वाचा बदल झालेला आहे याची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
PM Kisan Yojana news पूर्ण माहिती
देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यासाठी देशाची प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजना सुरू केली यांतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वर्षभर किसान योजनेचे तीन हप्ते मिळतात यात प्रत्येकी दोन दोन हजाराचे हे तीन हप्ते असतात आता यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे याचीच विश्लेषण माहिती आपण बघणार आहोत
कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार
पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तेव्हा, आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड (Aadhar Card) जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शिवाय, वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे, त्यांना व डॉक्टर, इंजिनिअर आहेत, जे प्राप्तकर भरतात, पेन्शनर आहेत, त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
योजना कधी सुरू झाली
शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जातो. डिसेंबर-२०१८ पासून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. आतापर्यंत १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे.
योजना सुरू झाली, त्यावेळी एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला. कालांतराने सरकारच्या एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह जे निवृत्त कर्मचारी होऊन पेन्शन घेत आहेत, प्राप्तिकर भरत आहेत.
योजनेत अनेक अपात्र लाभार्थी
तसेच डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, आर्किटेक्ट आहेत आदींना लाभ मिळत असल्याचे केंद्र सरकारच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. नवीन नियमांमुळे अनेकांचा या योजनेतून पत्ता कट होणार असून जे पात्र शेतकरी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजने यामध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत याचीच माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.