SSC HSC board exam 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात काय बदल झालाय का दहावीची परीक्षा कधी होणार आहे याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार SSC HSC board exam 2025 दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेले आहेत यामध्ये आता दहावीच्या परीक्षा कोणत्या वेळेत सुरू होणार बघुयत
SSC HSC board exam 2025 पूर्ण माहिती
SSC HSC board exam 2025 दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा अत्यंत जवळ आलेल्या आहेत यामध्ये आणखीन एक मोठे अपडेट येत असेल की दहावीच्या गोवा राज्यत परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार आहे आणि बारावीच्या परीक्षा त्याच्या आधीच म्हणजे 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे यामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे
महाराष्ट्र वेळापत्रक बदलणार का?
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा महाराष्ट्र राज्यात देखील आता जवळ आलेले आहेत परंतु वेळापत्रक बदलणार का असा प्रश्न विचारला जात आहे कारण शिक्षक संघटनांनी बोर्डाच्या काही निर्णयावर आक्षेप घेतलेला आहे परंतु अद्याप देखील काही निर्णय बदललेला नाहीये त्यामुळे वेळापत्रक ठरलेल्या वेळा प्रमाणे परीक्षा होणार आहेत विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा अशा प्रकारच्य आव्हान शरद गोसावी यांनी केले आहे.
दहावी परीक्षेसाठी यंदा कोलवाळ केंद्राची भर पडली आहे. कोलवाळ या नवीन केंद्रासह ३२ केंद्रांमधून परीक्षा होणार आहे. ठरल्या नुसार १ मार्चपासून परीक्षा सुरू होत असून मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.
परीक्षा वेळापत्रक
सकाळी ९.३० ते १२.३० पर्यंत परीक्षा असेल. १ मार्च ते १५ मार्चपर्यंत परीक्षा असेल. यानंतर तांत्रिक विषयांच्या परीक्षा होतील. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास लवकर येणे आवश्यक. सुटी जाहीर झाली तरीही पेपर पुढे ढकलला जाणार नाही. विद्यालयातील प्रात्यक्षिक परीक्षा ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
१ मार्च रोजी पहिली भाषा (इंग्रजी/मराठी/उर्दू) पेपर असेल. ३ मार्च रोजी दुसरी भाषा हिंदी, ५ मार्च रोजी तिसरी भाषा (इंग्रजी/मराठी/कन्नड/संस्कृत आदी विषय) पेपर असेल. ७ मार्च रोजी समाजशास्त्र १, ८ मार्च रोजी समाजशास्त्र २, १० मार्च रोजी गणित लेवल २, ११ मार्च रोजी गणित लेवल १ पेपर, १५ मार्च रोजी विज्ञानाचा पेपर असेल. यानंतर डेटा प्रोसेसिंग, डीटीपी या तांत्रिक विषयांचे पेपर २१ मार्चपर्यंत चालतील.
डिचोली, काणकोण, कुंकळ्ळी, कुडचडे, केपे, माशेल, मडगाव, मंगेशी, शिवोली, पणजी, हरमल, पेडणे, पिलार, फोंडा, सांगे, साखळी, शिरोडा, शिवोली, तिस्क – धारबांदोडा, वाळपई, वास्को, नावेली, पर्वरी, मांद्रे, कळंगुट, वेर्णा, हळदोणा, कुजिरा, पैंगीण, म्हापसा ए, म्हापसा बी, नेत्रावळी, कोलवाळ या ३२ केंद्रांत परीक्षा होतील. उर्दू माध्यमासाठी मडगाव, पणजी, वाळपई व वास्को या ४ केंद्रांत परीक्षा होईल.
तर वरील लेखनात आपण पाहिलं की गोवा राज्य परीक्षा ह्या दहावीद्वारे बोर्डाच्या सुरू होणार आहे याची माहिती बघितली तरी दहावी बारावी बोर्डाच्या सर्व नोट्स साठी या नंबर वर फोन करा किंवा प्लेस्टोर वरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा आणि आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी टेलिग्राम अथवा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा