WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PPF Interest Rate पत्नीच्या नावावर PPFअकाउंट काढा महिन्याला मिळतील 1लाख रुपये.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PPF Interest Rate  आज आपण पाहणार आहोत की मध्ये कशाप्रकारे आपल्याला चांगला मोबदला मिळेल आणि आपण जर पत्नीच्या नावावर अकाउंट काढले तर आपल्याला किती पैसे मिळतील अकाउंट काढण्यासाठी काय प्रोसिजर आहे ऑनलाइन ऑफलाइन कुठे अकाउंट काढतात या संपूर्ण ची माहिती आपण घेणार आहोत.

PPF Interest Rate  पूर्ण माहिती

PPF Interest Rate: पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (PPF) गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला एक लाख रुपयांहून जास्त उत्पन्न मिळवू शकता. पण यासाठी काही गोष्टींचे पालन करावे लागेल आणि 32 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. चला, जाणून घेऊया संपूर्ण प्लॅन –

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा भारत सरकारकडून चालवला जाणारा लॉन्ग टर्म सेव्हिंग प्लॅन आहे. या योजनेची सुरुवात 1968 साली भारत सरकारने केली होती. यामागील उद्देश गुंतवणूकदाराला आयकर अधिनियम, 1961 च्या सेक्शन 80C अंतर्गत करसवलत आणि हमीदार रिटर्न देणे हा आहे. कोणताही व्यक्ती पोस्ट ऑफिस किंवा बँकेत किमान 500 रुपयांच्या गुंतवणुकीने PPF अकाउंट उघडू शकतो. तसेच, तुम्ही तुमच्या पत्नीसाठी देखील PPF अकाउंट उघडू शकता. पाहूया, कोणताही गुंतवणूकदार PPF द्वारे दर महिन्याला 1,06,828 रुपयांची टॅक्स-फ्री इनकम कशी मिळवू शकतो

PPF ही एक रिटायरमेंट-केंद्रित योजना आहे, जी हमीदार रिटर्नसह आयकर अधिनियम, 1961 च्या सेक्शन 80C अंतर्गत करसवलत देते. या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो, मग तो सॅलरीड क्लास असो किंवा व्यवसाय करणारा. यामध्ये एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते.

PPF अकाउंट हे सर्व सामान्य साठी देखील आहे यामध्ये तुम्ही अकाउंट उघडून चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून त्याचा चांगला मोबदला मिळू शकतात यामध्ये व्यवसायिक असेल सॅलरी एम्प्लॉय असेल नॉन सॅलरी एम्प्लॉय असेल कोणी याच्यात गुंतवणूक करू शकतो त्यामुळे ही केंद्रशासित योजना आहे.
PPF चे मॅच्युरिटी कालावधी काय आहे?

PPF चा सुरुवातीचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा आहे. 15 वर्षांनंतर खातेधारक 5-5 वर्षांच्या अनलिमिटेड ब्लॉक्ससाठी खाते वाढवू शकतो. PPF खातेधारक पाचव्या वर्षानंतर आर्थिक गरज असल्यास एकदाच पैसे काढू शकतो. चौथ्या वर्षाच्या शेवटी किंवा पाचव्या वर्षाच्या सुरुवातीला उर्वरित रकमेच्या 50% पर्यंत रक्कम काढता येते.

दर महिन्याला 1.06 लाख रुपये कसे मिळवायचे?
PPF द्वारे दर महिन्याला 1,06,828 रुपये मिळवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक सुरू करावी लागेल आणि ती 15 वर्षांच्या मॅच्युरिटीपर्यंत चालू ठेवावी लागेल. व्याजाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 5 एप्रिलदरम्यान गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

15 वर्षांनंतर मॅच्युरिटी PPF Interest Rate  

जर तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर 15 वर्षांत तुम्ही एकूण 22.50 लाख रुपये गुंतवणूक कराल. या कालावधीत तुम्हाला सुमारे 18.18 लाख रुपयांचे व्याज मिळेल. यानुसार, मॅच्युरिटी रक्कम 40,68,209 रुपये होईल. नंतर खाते 5 वर्षांसाठी वाढवून पुन्हा दरवर्षी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक सुरू ठेवता येईल

20 आणि 25 वर्षांनंतर मॅच्युरिटी

20 वर्षांमध्ये गुंतवणूक 30 लाख रुपयांपर्यंत वाढेल आणि त्यावर 36,58,288 रुपयांचे व्याज मिळेल. मॅच्युरिटी रक्कम सुमारे 66,58,288 रुपये होईल. 25 वर्षांत गुंतवणूक 37.50 लाख रुपयांपर्यंत जाईल आणि व्याज सुमारे 65,58,015 रुपये असेल. त्यामुळे मॅच्युरिटी रक्कम 1,03,08,015 रुपये होईल.

29 वर्षांनंतर किती रक्कम मिळेल?

29 वर्षांपर्यंत दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक 43.50 लाख रुपये होईल, आणि व्याज सुमारे 99.26 लाख रुपये असेल. यामुळे मॅच्युरिटी रक्कम 1,42,76,621 रुपये होईल. 32 वर्षांनंतर ही गुंतवणूक 48 लाख रुपये होईल, आणि व्याज सुमारे 1,32,55,534 रुपये होईल. अशा प्रकारे, मॅच्युरिटी रक्कम 1,80,55,534 रुपये होईल.

दर महिन्याचा व्याज कसा काढायचा? PPF Interest Rate  

32 वर्षांनंतर जर तुम्ही ही रक्कम बँकेत 7.1% वार्षिक व्याजदराने जमा केली, तर तुम्हाला सुमारे 15 लाख 4 हजार रुपये वार्षिक व्याज मिळेल. हे व्याज 12 महिन्यांत विभागले, तर तुम्हाला दर महिन्याला 1.06 लाख रुपये मिळतील.

वरील लेखनात आपण ईपीएफ अकाउंट कसे उघडायचे याचा मोबदला कसा मिळणार याची माहिती घेतली आहे तरी तुम्ही अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या नंबर वर संपर्क करा

Leave a Comment