WhatsApp new update 2025 आज आपण पाहणार आहोत की सर्वसामान्य जग हे whatsapp या सोशल मीडियाच्या सॉफ्टवेअर पासून आज जोडलेले आहेत याच व्हाट्सअप मध्ये काही नवीन अपडेट आलेले आहे याचा फायदा आपल्याला सर्वांना कसा होईल आणि कोणते अपडेट आलेले आहे याचीच माहिती आपण यात घेणार आहोत
WhatsApp new update 2025 पूर्ण माहिती
WhatsApp सतत नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. गेल्यावर्षी देखील लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅपनं अनेक नवीन फीचर्स रोल आउट केले होते. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीनं दोन नवीन फीचर्स रोल आउट केले आहेत. युजर्स आपल्या सेल्फीका वापर करून स्टिकर्स बनवू शकतात.
तसेच, मेसेजवर रिअॅक्शन देणे देखील सोपं झालं आहे. हे फिचर iOS आणि अँड्रॉइड दोन्ही युजर्ससाठी रोल आउट करण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया यांचा वापर कसा करायचा.
आज लहानांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वजण व्हाट्सअप चा उपयोग करत आहेत यामुळे सर्व जग एकमेकांशी कनेक्टेड झालेले आहे व्हाट्सअप मध्ये व्हिडिओ कॉलिंग व्हॉइस रेकॉर्डिंग त्याचप्रमाणे आणखीन काही फीचर आहेत यातच आता नवीन एका अपडेट मध्ये व्हाट्सअप वापरणे आता खूपच सोपे होणार आहे तुम्हाला क्विक रिएक्शन देण्यात येणार आहेत
WhatsApp नं 14 जानेवारी, 2025 रोजी एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून अॅपच्या नवीन फीचर्सची माहिती दिली आहे. ब्लॉग पोस्टमध्ये कॅमेरा इफेक्ट्स, सेल्फी स्टिकर्स, शेअर स्टिकर पॅक आणि क्विक रिअॅक्शन फीचरची माहिती देण्यात आली आहे.
कॅमेरा इफेक्ट्स आणि शेअर स्टिकर पॅक हे फिचर आधीपासूनच व्हॉट्सअॅप मध्ये उपलब्ध आहेत. परंतु, इतर दोन फीचर आता रोल आउट केले जात आहेत.
क्विकर रिअॅक्शन्स काय असेल WhatsApp new update 2025
WhatsApp युजर्स आता मेसेजवर सहज रिअॅक्शन देऊ शकतात. आतापर्यंत तुम्हाला रिअॅक्शन देण्यासाठी मेसेज वर लॉन्ग प्रेस करून ठेवावं लागत होतं. त्यानंतर रिअॅक्शनची यादी खाली दिसत होती.
आता ही प्रोसेस सोपी करण्यासाठी व्हॉट्सअॅपनं अॅप डबल टॅप करून रिअॅक्शन लिस्ट ओपन करण्याचा पर्याय दिला आहे. असा पर्याय इन्स्टाग्राम वर रिअॅक्शन देण्यासाठी देखील उपलब्ध आहे. हे दोन्ही फीचर्स व्हॉट्सअॅप युजर्सच्या कामी येतील
दैनंदिन जीवनात व्हाट्सअप चा वापर करून आपण त्वरित कुठल्याही व्यक्तीला लगेच संपर्क करू शकतो मेसेज करू शकतो परंतु त्यात काही आपल्याला टाईप करण्यात बोलण्यात अडचण येतात परंतु व्हाट्सअप नाही क्विकर रिएक्शन नावाचे फीचर दिल्यामुळे ग्राहकांना धारकांना याचा फायदा होणार आहे
कस्टम स्टिकरच्या चाहत्यांना सेल्फी स्टिकर फीचर खूप आवडेल. आता तुम्ही तुमचा सेल्फी थेट स्टिकरमध्ये रूपांतरित करू शकता. यासाठी तुम्हाला स्टिकर ऑप्शनवर टॅप करावे लागेल. त्यानंतर क्रिएट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्टिकर सोबत एक कॅमेरा आयकॉन दिसेल.
ज्यावर क्लिक करताच कॅमेरा ओपन होईल. त्यानंतर तुम्ही सेल्फी स्टिकर बनवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या फोटो सोबत टेक्स्ट मेसेज देखील जोडू शकता, तसेच इतर अनेक क्लिप आर्ट जोडण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहेत
वरील लेखनात आपण व्हाट्सअप कशाप्रकारे एक नवीन अपडेट घेऊन येत आहे याची माहिती घेतली आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा