WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 १०वी १२वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! बोर्डाचा मोठा निर्णय विद्यार्थी आनंदात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे नुकत्याच दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आलेले आहेत या संदर्भात आता बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे याचीच बातमी आपण या सविस्तर वृत्तांत पाहणार आहोत

SSC HSC board exam 2025 पूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेकडे कलागुणांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी २४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले हे प्रस्ताव विभागीय मंडळाकडे दाखल करण्यासाठी शाळांनाही मुदतवाढ देण्यात आली असून शाळांनी हे प्रस्ताव ३१ जानेवारीपर्यंत विभागीय मंडळांकडे सादर करावयाचे आहेत.

विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार SSC HSC board exam 2025

चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या तसेच शास्त्रीय कला आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळवण्यासाठीचे प्रस्ताव माध्यमिक शाळांकडे दाखल करण्यासाठी १५ डिसेंबर २०२४ ची मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले हे प्रस्ताव माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळांकडे सादर करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२५ होती. परंतु एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

त्यामुळे या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ देण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी पत्रकाद्वारे दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात तर इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान होणार आहे.

आऊट ऑफ टर्न परीक्षा कधी?SSC HSC board exam 2025

यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण व श्रेणी ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे निर्देश माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आऊट ऑफ टर्न परीक्षा लेखी परीक्षेनंतर एसएससी बोर्डाने कळवलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित केली जाणार आहे.

वरील लेखनात आपण दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कुठली आनंदाची बातमी आहे ही पाहिले आहे दहावी बारावी बोर्ड नोट्स साठी 9322515123 या नंबर वर संपर्क करा आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment