दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बोर्डाकडून मिळणार ५गुण SSC HSC board exam timetable 2024
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला दहावी बारावीच्या परीक्षेत बोर्डाकडून पासवर्ड मिळणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षेत कला, चित्रकला, क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह एनसीसी, स्काऊट व गाईडमधील सहभागाबद्दल सवलतीचे गुण दिले जातात. आता यात ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमात सहभागाबद्दल ही सवलतीचे गुण देण्याचा विचार होतो आहे. तसा प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठविण्यात आला आह
राज्यात शिक्षण संचालनालय योजना कार्यालयाकडून ‘नवभारत साक्षरता’ उपक्रमासह ३९ योजना, उपक्रम राबविले जातात. साक्षरता उपक्रमात शिक्षकांचा प्रतिसाद नगण्य आहे. शिक्षकांचा सहभाग कमी असल्याने निश्चित उद्दिष्ट साध्य होणे अवघड ठरण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये निरक्षरांची संख्या नेमकी किती याबाबत स्पष्टता नाही आहे
२०११ मधील जनगणनेनुसार राज्यभरात १ कोटी ६२ लाखांपेक्षा अधिक निरक्षर असल्याचे सांगण्यात येते. २०३० पर्यंत सर्वांना साक्षर करण्याचे उल्लास नवभारत साक्षरता मोहिमे अंतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आले. परंतु शिक्षकांचा सहभाग कमी असल्याने उपक्रम अडखळत सुरु असल्याचे सांगण्यात येते. आता त्यात काम करणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभाग ‘सवलतीचे गुण’ यावर विचार करत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे नुकताच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आता तो राज्य सरकारकडे जाईल. आणि धोरणात्मक निर्णय होईल, असे सांगण्यात येते आहे
दहावी, बारावी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा गुणांसह आता निरक्षरांना साक्षर करण्यासाठीही सवलतीचे गुण मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्वयंसेवकाने किमान पाच निरक्षरांना साक्षर केले, तर पाच गुण मिळतील. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शिक्षण संचालनालय (योजना) यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पाठवला आहेत
साक्षरता मोहिमेत निरक्षरांना पाच टप्प्यांत शिक्षण दिले जाणार आहे. यात पायाभूत साक्षरतेचा पहिला टप्पा असून त्यात लेखन, वाचन, संख्याज्ञान याचा समावेश आहे. यानंतर जीवन कौशल्य विकास असेल. ज्यामध्ये आर्थिक, कायदेविषयक साक्षरतेवर भर राहील. यानंतर मुलभूत शिक्षण, व्यावसायिक कौशल्य प्राप्ती आणि निरंतर शिक्षण आहे. शिक्षक गावात सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करतात. आणि या निरक्षरांना साक्षर करण्याचे काम स्वयंसेवक करतात. आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी हे काम करतात. त्यांच्या या कामासाठी सवलतीचे गुण दिले तर शंभर टक्के सहभाग मिळेल. आणि पालकही सहभागी होतील, असे शिक्षण विभागाला वाटते. एका स्वयंसेवकाला अधिकाधिक पाच गुण दिले जातील. त्यासाठी किमान त्याला पाच निरक्षरांना साक्षर करावे लागेल, अशी अट असे आहे