WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडक्या लेकीला मिळणार एक लाख आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडक्या लेकीला मिळणार एक लाख आताच अर्ज करा

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेतून मुलींना सक्षम बनविण्यासाठी त्यांचे शिक्षण योग्यरित्या व्हावे, यासाठी शासनाकडून वयाच्या १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांकडून या योजनेसाठी अर्ज भरुन घेता येणार असून, गावागावांत योजनेची अंगण सेविकांकडून माहिती दिली जात आहे

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचा जन्मदर वाढावा, तिच्या शिक्षणास चालना मिळावी, मुलींचे कुपोषण कमी व्हावे आदी बाबींचा विचार करून सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. याअंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ मिळावा, यासाठी अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करण्याची तयारी केली आहे

या योजनेत १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलीला १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी लाभार्थीनी अंगणवाडी केंद्र, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत

१ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुल ।।। या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळा अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची टाकण्यात आलेली आहेत

असा मिळणार लाभ

पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, १२ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये अशा रीतीने एकूण एक लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहेत

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

जन्माचा दाखला, कुटुंबप्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेराक्स, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र दाखला ही कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहे..

अंगणवाडी सेविकेकडे करा अर्ज

या अर्जात वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाइल नंबर, अपत्याची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला, ही माहिती द्यायची आहे. अर्ज भरून झाला की, अंगणवाडी सेविकेकडून पोचपावती दिली जाणार आहेत

Leave a Comment