UPI payment update आज आपण बनवतो यूपीआय धारकांसाठी कोणती मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे आणि यूपीआय पेमेंट तुम्ही करत असतात गुगल पे फोन पे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे कारण युपी आहे पेमेंट सिस्टम मध्ये आता मोठा बदल होणार आहे तो ग्राहकांच्या दृष्टीने फायद्याचा असणार आहे नेमका कोणता हा बदल आहे आणि याचा आपल्याला काय फायदा होणार आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत.
UPI payment update संपूर्ण माहिती
आजच्या डिजिटल युगामध्ये मध्ये तुम्ही बघत असाल की एकदा छोट्या व्यापाऱ्यापासून तर मोठे व्यापारी मध्ये सर्वत्र ऑनलाईन व्यवहार होत असतात एक रुपयापासून ते करोडो रुपये ऑनलाईन होत असतात आणि प्रत्येकाकडे आज तुम्ही बघितलं असेल GOOGLE पे फोन पे वेगळ्या प्रकारचे ऑनलाइन प्रणालीचे सॉफ्टवेअर आहे त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पेमेंट त्वरित करत असतात यामुळे आता गुगल पे फोन पे सतत अपडेट होत असताना त्याच्यामध्ये काही ना काही बदल करत असतात त्यामुळे आता ग्राहकांना याचा मोठा लाभ होणार आहे पेमेंट सिस्टम मध्ये बदल होणार आहे बघूया संपूर्ण माहिती
UPI payment update जर तुम्ही दररोज यूपीआयनं पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. १६ जून २०२५ पासून डेबिट आणि क्रेडिट यूपीआय दोन्ही व्यवहार दुप्पट वेगानं पूर्ण होतील. एका व्यवहाराला सुमारे ३० सेकंद लागायचे, परंतु या प्रक्रियेत ते केवळ १५ सेकंदात पूर्ण होईल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा बदल करण्यात येत आहे, ज्यामध्ये सर्व बँका आणि पेमेंट अॅप्सना एपीआय रिस्पॉन्स टाइम कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.इतकंच नाही तर एखादा व्यवहार अयशस्वी झाला किंवा चुकून झाला तर त्याचे स्टेटस चेक किंवा रिव्हर्स करण्यासाठी आता फक्त १० सेकंद लागतील. यासाठी यापूर्वी ३० सेकंद लागत होते
काही कारणास्तव व्यवहाराची स्थिती लगेच दिसत नसेल तर बँक किंवा अॅप (उदा. फोनपे, पेटीएम) ‘चेक ट्रान्झॅक्शन स्टेटस एपीआय’च्या माध्यमातून स्टेटस शोधतात. आतापर्यंत एपीआय ९० सेकंदानंतर सुरू होत होता. जून २०२५ पासून हे अवघ्या ४५-६० सेकंदात सुरू करता येईल. म्हणजेच व्यवहाराची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला अर्धा वेळ लागेल.
पेमेंट सिस्टमची विश्वासार्हता आणि वेग दोन्ही सुधारेल
टेकफिनीचे सहसंस्थापक जय कुमार यांनी स्पष्ट केलं की, युजर्सना आपला व्यवहार झाला आहे की नाही याची माहिती त्वरीत मिळावी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. यामुळे पेमेंट सिस्टमची विश्वासार्हता आणि वेग दोन्ही सुधारेल. याचा थेट फायदा यूपीआय युजर्सना होणार आहे
यूपीआयच्या युजर्सना नवीन एपीआय नियम आणि वेळेतील बदलांचा थेट फायदा मिळणार आहे. चला जाणून घेऊया काही ठिकाणी ग्राहकांना होणाऱ्या फायद्यांविषयी…
फास्ट स्टेटस अपडेट : त्वरित व्यवहाराची स्थिती कळेल, ज्यामुळे प्रतीक्षा कालावधी कमी होईल.
फेल्युअर मार्किंगपासून मिळणार दिलासा
पूर्वी किरकोळ तांत्रिक अडचणींमुळे व्यवहार अयशस्वी मानले जात होते. आता ते कमी होतील.
विश्वास आणि अनुभव सुधारला : यूपीआय युजर्सना प्रत्येक व्यवहारासह अधिक चांगला आणि वेगवान अनुभव मिळेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की गुगल पे फोन पे मध्ये काय बदल होणारे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा