WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPI new update UPI धारकांसाठी आनंदाची बातमी झाला मोठा बदल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPI new update आज आपण पाहणार की यूपीआय धारकांसाठी कोणत्या आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेणार आहोत याच्यामध्ये कोणता बदल झालेला आहे आणि आपण आता या बदलामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे

UPI new update संपूर्ण माहिती

राज्यातील युपीय धारकांसाठी एक महत्त्वाचे आनंदाची बातमी समोर येत आहे आज तुम्ही बघत असतात की प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन व्यवहार असतात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी एक रुपयापासून ते लाखापर्यंत आपण व्यवहार करतो सेकंदामध्ये करतो कुठलाही व्यक्ती कुठेही व्यवहार करू शकतो आता या यूपी पेमेंट मध्ये इंटरनेटची गरज असते परंतु तुम्हाला माहिती आहे का इंटरनेट शिवाय देखील तुम्ही आता पेमेंट करू शकणार आहात बघूया त्याविषयी माहिती

UPI new update सध्याच्या आधुनिक युगात आपण सर्वजण पैसे पाठवण्यासाठी UPI चा वापर करतो. मात्र अनेकदा इंटरनेट नसल्यामुळे आपल्याला पैसे पाठवण्यात अडचण येते. त्यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. भारत सरकार आणि NPCI ने एक खास सेवा प्रदान केली आहे जी USSD आधारित UPI सेवा आहे.

USSD आधारित UPI सेवा वापरण्यासाठी तु्म्हाला इंटनेटची गरज भासत नाही. ही सेवा *99# क्रमांकाद्वारे काम करते. याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सेवा कशी काम करते? एकावेळी किती पैसे पाठवता येतात याबाबत माहिती जाणून घेऊयात.

*99# UPI सेवा काय आहे?
*99# ही USSD आधारित मोबाइल बँकिंग सेवा आहे. या सेवेद्वारे इंटरनेटशिवाय आणि स्मार्टफोनशिवाय पैसे पाठवता येतात. तसेच बँक बॅलन्स तपासता येतो, तसेच तुमचा UPI पिन देखील बदलता येतो. महत्वाची बाब म्हणजे ही सेवा 24×7 काम करते आणि देशातील Airtel, Jio, Vi, BSNL या सर्व मोबाइल नेटवर्कवर उपलब्ध आहे.

इंटरनेटशिवाय पैसे कसे पाठवायचे?
इंटरनेट नसताना पैसे पाठवायचे असतील तर सर्वप्रथम *99# टाइप करा आणि कॉल करा. यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय मिळेल. भाषा निवडल्यानंतर 1 डायल करा. यानंतर, ज्या UPI आयडीवर तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत ती माहिती प्रदान करा. यानंतर UPI पिन टाकण्यास सांगितले जाईल. पिन व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवू शकाल. या सेवेद्वारे तुम्ही फक्त 5000 रुपये ट्रान्सफर करू शकता. *99# ला कॉल करुन तुम्ही तुमचा UPI पिन देखील बदलू शकता.

UPI पिन कसा सेट करायचा?
तुमच्या मोबाईलच्या डायलरमध्ये *99# कोड टाका आणि कॉल करा, यानंतर भाषा निवडा. यानंतर Set UPI PIN चा पर्याय निवडा. हा पर्याय 5 व्या क्रमांकावर मिळू शकेल. यानंतर अकाउंट नंबरचे शेवटचे 6 अंक आणि डेबिट कार्डची एक्सपायरी डेट टाका. यानंतर मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाका. यानंतर तुम्हाला UPI पिन सेट करण्यास सांगितले जाईल.

अशाप्रकारे आपण बघितलं धारकांसाठी कोणत्या आनंदाची बातमी याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन  ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment