Swami Dayanand शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक अडचणी अनेक विद्यार्थ्यांसमोर येतात, विशेषतः जे उच्च दर्जाचे व्यावसायिक अभ्यासक्रम करतात. स्वामी दयानंद फाउंडेशन ने सुरु केलेली स्वामी दयानंद इंडिया शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने तयार केली आहे.
ही शिष्यवृत्ती इंजिनियरिंग (BE/B.Tech), वैद्यकीय (MBBS) आणि वास्तुशास्त्र (B.Arch) यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी भारतभरातील विद्यार्थ्यांना दिली जाते. या शिष्यवृत्तीचा उद्देश हुशार पण आर्थिक दृष्ट्या कमी सक्षमी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सातत्य राखण्यास मदत करणे आहे.
शिष्यवृत्ती रक्कम
या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला ₹50,000 (पन्नास हजार रुपये) देण्यात येतात. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या अभ्यास खर्च, कॉलेज फी आणि इतर आवश्यक खर्चासाठी सहाय्य करते.
पात्र अभ्यासक्रम
शिष्यवृत्ती अर्जासाठी खालील अभ्यासक्रम पात्र आहेत:
- अभियांत्रिकी (BE/B.Tech)
- वास्तुशास्त्र (B.Arch)
- वैद्यकीय (MBBS)
फक्त या अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्जासाठी पात्र आहेत.
पात्रता निकष
शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी काही महत्वाचे निकष आहेत:
- वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी, ज्यांनी १२वीत किमान ८०% गुण मिळवलेले आहेत, ते अर्ज करू शकतात.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१२ लाखांपेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी NEET / JEE परीक्षा १२वीच्या त्या वर्षी उत्तीर्ण केलेले असले पाहिजे. (गॅप वर्ष असलेले विद्यार्थी पात्र नाहीत)
- एकूण शिष्यवृत्तींपैकी ३०% मुलींसाठी राखीव आहेत.
- शासकीय शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
अर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- विद्यार्थ्याचा फोटो
- कॉलेज ॲडमिशन लेटर किंवा कॉलेज आयडी कार्ड
- 10वी व 12वी मार्कशीट / प्रमाणपत्र
- JEE/NEET निकाल
- कॉलेज फी पावत्या
- कुटुंबाचे उत्पन्न पुरावा (Salary Slip / IT Return / Pension Copy)
- वीज किंवा पाणी बिल
- पालक शेतकरी असल्यास शेतीचे कागदपत्र
- BPL कार्ड (लागू असल्यास)
- व्यवसाय असल्यास दुकानाचे फोटो
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन केली जाते. विद्यार्थी खालील लिंकवर जाऊन अर्ज सादर करू शकतात:
https://www.swamidayanand.org/scholarship-india
अधिक माहिती
शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती, अटी व नियम आणि अर्ज प्रक्रियेसाठी खालील लिंक वापरता येईल:
https://www.swamidayanand.org/scholarship-india
संपर्क तपशील
- पत्ता: Swami Dayanand Education Foundation, A-74, ग्राउंड फ्लोअर, सेक्टर-2, नोएडा – 201301, उत्तर प्रदेश, भारत
- ईमेल: scholarships@swamidayanand.org
- फोन: +91-120-4146823
- WhatsApp: 8448770654
Disclaimer: हा लेख फक्त मार्गदर्शनासाठी आहे. शिष्यवृत्तीच्या अटी, नियम आणि अर्ज प्रक्रिया संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर दिल्याप्रमाणे बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी सद्यस्थितीची खात्री करणे आवश्यक आहे.
