SSC HSC time table 2025 बोर्ड परीक्षा
SSC HSC time table 2025आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार तसेच ते कसे डाउनलोड करायचे आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एमएसबीएसएचएसईची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in येथे आजपासूनदहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक उपलब्द करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि १७ मार्च २०२५ रोजी संपेल. दहावीची परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पहिली शिफ्ट आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दुसरी शिफ्ट अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे.
SSC HSC time table 2025 पुढील परीक्षा कसे असतील
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता सन 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
SSC HSC time table 2025 काही बदल
इयत्ता बारावी सामान्य, बायफोकल आणि व्होकेशनल अभ्यासक्रमांची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि ११ मार्च २०१५ रोजी संपेल. पहिली शिफ्ट सकाळी ११.०० ते दुपारी २.०० आणि दुसरी शिफ्ट दुपारी ०३.०० ते सायंकाळी ६.०० अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. दहावीच्या गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पध्दतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. ज्यावर्षी या निकषात बदल होतील, त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटक यांनी घ्यावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली Board Exam.
SSC HSC time table 2025 परीक्षा वेळापत्रक
लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी SSC HSC board timetable 2025
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि १८ मार्च २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा – शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५
महाराष्ट्र बोर्डाने 21 नोव्हेंबर 2024रोजी अधिकृत वेबसाइट msbshse.org वर वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तसेच वेळापत्रका संदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या 23 ऑगस्टपर्यंत राज्य मंडळाने मागविल्या होत्या.
वरील लेखनात आपण दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रकाची पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.