SSC HSC time table 2025
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे दहावी बारावी बोर्ड परीक्षा होणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत दहावी बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे
SSC HSC time table 2025 बोर्डाचे नवीन नियम
२१ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार सर्वच शाळांमध्ये कॅमेरे बंधनकारक आहेत. याशिवाय यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी बारावीचे तीन तर दहावीचे दोन केंद्रे वाढली आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके, बैठे पथकांचे नियोजन अस आहे.
SSC HSC time table 2025 New update
इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा आता काही दिवसांवर असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यात यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचे दोन परीक्षा केंद्रे वाढली असून जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर त्यांची परीक्षा होईल. तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची तीन केंद्रे वाढली असून जिल्ह्यात बारावीसाठी १२४ केंद्रे असणार आहेत.
SSC HSC time table 2025
सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता बारावीचे जवळपास ५८ हजार विद्यार्थी तर इयत्ता दहावीतील ६३ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांची १२४ केंद्रांवर आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची १८४ केंद्रांवर परीक्षा होईल. सध्या केंद्र संचालकांची यादी अद्ययावत केली जात आहे. दोन्ही परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत असणार आहे पण ज्या केंद्राजवळ दुसरे केंद्र नाहीअशा केंद्रांसाठी ही पद्धत लागू नाही.
SSC HSC time table 2025
दुसरीकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या आदेशानुसार बोर्ड परीक्षेच्या अनुषंगा जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांची पाहणी केली. त्यावेळा बहुतेक परीक्षा केंद्रांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
SSC HSC time table 2025
संस्थांनी निधीचे कारण पुढे केल्याने
अधिकाऱ्यांचीच कोंडी झाल्याचे चित्र आहे. तरीपण, त्यांनी शासनाच्या २१ ऑगस्ट २०२४च्या निर्णयाकडे बोट दाखवून त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता नियोजनबद्ध अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहनही शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके, बैठे पथकांचे नियोजन SSC HSC time table 2025
२१ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार सर्वच शाळांमध्ये कॅमेरे बंधनकारक आहेत. याशिवाय यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी बारावीचे तीन तर दहावीचे दोन केंद्रे वाढली आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके, बैठे पथकांचे नियोजन असणार आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
परीक्षांचे वेळापत्रक असे…SSC HSC time table 2025
- इयत्ता दहावी : प्रात्यक्षिक- ३ ते २० फेब्रुवारी २०२५ आणि लेखी- २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत
इयत्ता बारावी : प्रात्यक्षिक- २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ आणि लेखी- ११ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत