SSC HSC Imarathi MP 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर पॅटर्न बदलला आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत यामुळे विद्यार्थ्यांवर काही परिणाम होणार आहे त्याचप्रमाणे आपण या नवीन पेपर पॅटर्नचा अभ्यास कशाप्रकारे आपल्याला करता येईल याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत
SSC HSC marathi IMP 2025 पूर्ण माहिती
राज्यात दहावी-बारवी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत नुकत्याच बारावीच्या परीक्षा सुरू झाली असून इंग्रजी पेपर देखील त्यांचा झालेला आहे आणखीन एक मोठी अपडेट आपल्या समोर दिलेले आहे बोर्डाचा आता पेपर पॅटर्न बदलणार आणि तो पेपर पॅटर्न परीक्षा पद्धती लागू होणार त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आता अभ्यास करणे आणखी सोपा होणार आहे नंतर नवीन बोर्ड पॅटर्न कसा आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात
नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा आता चालू आहेत राज्यांमध्ये जवळपास 34 लाख विद्यार्थी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा देत आहेत परंतु या परीक्षा आता सध्या तरी लेखी आधारित आहे कृती आकृती यांच्यावर बेसिस डिपेंड आहेत परंतु येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा आकला जात आहे यानुसार बोर्डाचा पॅटर्न बदलणार आहे जास्तीत जास्त मुलांना ऍक्टिव्हिटी बेस्ट प्रश्न असते आणि त्याचप्रमाणे त्यांना पाठांतराचे विषय कमी असणार आहे
नवीन बोर्ड पॅटर्न कधी लागू होणार
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यावर्षी देखील परीक्षा सुरू आहेत परंतु पुढच्या वर्षी देखील जुना पॅटर्न लागणार का नवीन पॅटर्न याबाबत अध्याप तर तरी आणखीन पूर्ण माहिती आपल्याकडे सरकारने दिलेली नाहीये परंतु पुढच्या वर्षापासून लागू करण्यासाठी आता काही पालकांच्या शिक्षकांच्या हरकती वगैरे नोंद घेतल्या जातील त्यानंतर तो निर्णय घेतला जाईल.
दहावी, बारावीची परीक्षा पद्धत आणि निकालावरुन नेहमीच बोट ठेवलं जातं. शिक्षण तज्ञांमध्येही मतमतांतरे आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एससीईआरटीने आता विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी यासाठी पुढाकार घेतलाय.
तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे. तो आराखडा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून त्यावर हरकती मागविल्या होत्या. आता तो आराखडा अंतिम करण्यात आलाय. त्यात क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर दिला आहे. महत्वाचे काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊ…
कसा असेल नवीन आराखडा ?
- तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा पाठ्यक्रम
- मानवी मूल्ये, जीवन कौशल्ये, नैतिकतेवर आधारित शिक्षण
- पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीतून ज्ञाननिर्मिती
- करण्याचा उद्देश
- तिसरी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा दोन सत्रात होणार
- परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर देण्यात येणार
- आगामी दहावी-बारावीची परीक्षा 10 दिवस आधी होणार
नवीन आराखड्यात आरोग्य, कला आणि व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आलाय. व्यावसायिक शिक्षणांतर्गत कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असे नावीन्यपूर्ण विषय असतील. आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा दहावी-बारावीसाठी लागू करण्याचं नियोजन आहे.
दहावी-बारावीची परीक्षा काही दिवस अलीकडे घेण्याचं नियोजित आहे. त्यावरील हरकती, सूचना पाहून बोर्डाकडून काही दिवसात अंतिम वेळापत्रक जाहीर केलं जाईल. हा नवीन पॅटर्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला पूरक ठरणार का हे येत्या काळात कळणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पॅटर्न मध्ये काय बदल होणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.