SSC HSC hallticket download link 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनात भरपूर महत्त्वाच्या असतात यामध्ये आता दहावी बारावी बोर्डाचे हॉल तिकीट आलेले आहे याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत त्याचा काही फायदा होणार आहे याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
SSC HSC hallticket download link 2025 पूर्ण माहिती
महाराष्ट्रा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीला तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीला सुरू होणार आहेत. बोर्डाकडून या परीक्षेचे पेपर होण्याआधीच निकाल कधीपर्यंत लागेल याची माहिती दिली आहे
. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दहावी-बारावी परीक्षेचा निकाल १५ मे पर्यंत लागणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान, आता दहावी बारावीच्या हॉलतिकिटात मोठे बदल केल्याचं समोर आलंय. बारावीचे हॉल तिकीट देण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आलीय. या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आला आहे
बोर्डाच्या हॉल तिकीटवर हा बदल SSC HSC hallticket download link 2025
बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्यानं पालकांनाही धक्का बसलाय. कास्ट कॅटगरी असा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर कशासाठी असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे. हॉल तिकिटावर करण्यात आलेल्या बदलाबाबत बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हॉल तिकिटामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. विषयनिहाय न देता तारखेनुसार कोणते पेपर आहेत याची माहिती हॉल तिकिटावर दिली गेलीय.
बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले
शरद गोसावी यांनी म्हटलं की, शाळेत विद्यार्थ्यांची कोणती जात नोंदवण्यात आलीय याची माहिती पालकांनाही व्हावी म्हणून दहावी आणि बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केला आहे. यंदापासून यासाठी कास्ट कॅटगरीचा रकाना हॉल तिकिटावर असणार आहे.
शालेय शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी गेला की बदल करता येत नाहीत. त्यामुळे चुकीची नोंद झाली असल्यास पालकांना योग्य ती कागदपत्रे सादर करून शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक कार्यालयातून दुरुस्ती करता येईल.
या बदलामुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा
शालेय कागदपत्रावर विद्यार्थ्याची कोणती जात नोंदवली आहे याची पालकांना माहिती व्हावी यासाठीच असा निर्णय घेतल्याचं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सामाजिक न्याय विभागाला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याची जातनिहाय आकडेवारी द्यावी लागते. यासाठीही हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्याच्या गोष्टीचा फायदा होईल असं बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी म्हटलं.
तसेच यावर्षी परीक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डाने वेगवेगळ्या प्रकारच्या उपायोजना राबवलेल्या आहेत परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जनजागृती त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही हे बंधनकार करण्यात आलेले आहे आणि ज्या सेंटरवर मुलांच्या परीक्षा असतील त्या ठिकाणी बाह्य शाळेतील पर्यवेक्षक संचालक असणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा अशा प्रकारे बोर्डाकडून आव्हान करण्यात आलेले आहे.
वरील लेखनात आपण दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कुठली आनंदाची बातमी आहे ही पाहिले आहे दहावी बारावी बोर्ड नोट्स साठी 9322515123 या नंबर वर संपर्क करा आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा