WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC hallticket 2025 दहावी बारावीच्या हॉल तिकीट मध्ये मोठा बदल बोर्डाचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC hallticket 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावीच्या परीक्षेच्या जवळ आलेले आहेत यामध्ये दहावी बारावी बोर्डाच्या हॉल तिकीट मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे कोणते बदल झालेत कशामुळे झालेत याची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

SSC HSC hallticket 2025 पूर्ण माहिती

SSC HSC hallticket 2025 दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आलेले आहेत यामध्ये आता विद्यार्थी तोंडी परीक्षा देखील देणार आहेत त्यातच आता हॉल तिकीट मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे तोंडी परीक्षा दहावी बारावीच्या लवकरच सुरू होणार आहेत परंतु त्याआधी त्यांना हॉल तिकीट लागणार आहेत दहावी बारावीच्या हॉल तिकीट संदर्भात एक सर्वात मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे

दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आज वाटप झाले

दहावी बोर्डाचे हॉल तिकीट हे आजपासून वाटप करण्यात आलेले आहेत ऑनलाइन प्रणाली मध्ये प्रत्येक शाळेच्या लॉगिन मध्ये जाऊन ती डाऊनलोड करायचे असतात त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक ही हॉल तिकीट डाउनलोड करून विद्यार्थ्यांना सुपूर्त करतात त्यामुळे आता दहावीच्या बोर्ड विद्यार्थ्यांना हॉल तिकीट हे शाळेत मिळणार आहेत

इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रासंदर्भात (Hall Ticket) एक मोठी बातमी समोर आली आहे. हॉल तिकीटांवर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा (Caste Category) उल्लेख करण्यात आल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. तर हॉल तिकीटवर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. परिणामी, या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे. आता इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी नोव्याने प्रवेशपत्र जारी करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

शिक्षण मंडळाकडून दिलगिरी, विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट

पुढे आलेल्या माहितीनुसार दहावीच्या हॉल तिकीटांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख आता काढण्यात आला आहे. परीक्षेसाठीच्या हॉल तिकीटांवर जातीच्या प्रवर्गाचा (कास्ट कॅटेगरी) उल्लेख करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून करण्यात आला होता. मात्र सर्व स्थरातून होत होत असलेल्या या निर्णयासंदर्भातील टीकेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलगिरी व्यक्त करत हा निर्णय रद्द केला आहे. आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी काय म्हणाले SSC HSC hallticket 202

दहावी बारावीच्या बोर्डाच्या हॉल तिकीट मध्ये वाद उत्पन्न झाला होता त्यावरून आता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एक महत्त्वाचा सूचक वक्तव्य दिलेला आहे दहावी बारावीच्या बोर्डाच्या हॉल तिकीट मध्ये इतिहासात पहिल्यांदाच हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे काही समाजसेवकांनी याच्यावर आक्षेप घेतला त्यामुळे बोर्डाने हा निर्णय मागे घेत परत नव्याने हॉल तिकीट दिले परंतु त्यात जात प्रवर्ग ठेवला नाही आहेत

राज्यात 11 फेब्रुवारीपासून बारावीची (एचएससी) तर 21 फेब्रुवारीपासून दहावी (एसएससी) बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने हॉल तिकीट ऑनलाईन डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना आता नव्याने हॉल तिकीट उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे. ज्यावर जातीच्या प्रवर्गाचा (कास्ट कॅटेगरी) उल्लेख केला जाणार नसल्याची माहिती पुढे आली आहे.

बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती, बोर्डाकडून आयोजन

इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात त्या अनुषंगाने येत्या 20 ते 26 जानेवारी दरम्यान जनजागृती सप्ताहाचे बोर्डाकडून आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 21 जानेवारीला दहावी आणि बारावी बोर्डाचे सर्व विद्यार्थी परिपाठावेळी कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कॉपीमुक्त अभियान दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी बोर्डाकडून राबवण्यात येत आहे. या सगळ्याच्या जनजागृतीसाठी 20 ते 26 जानेवारी दरम्यान जनजागृती सप्ताह आयोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

बोर्डाच्या परीक्षा कशा होणार SSC HSC hallticket 2025


बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी राज्य बोर्ड मंडळ हे आता सतर्क झाले असून यावर्षी राज्यात कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी राज्यातील बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट प्रत्येक केंद्राला सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही हे कार्यरत असले पाहिजेत तरच त्या सेंटरला दहावी बारावीच्या सेंटरची मान्यता मिळेल आणि त्या ठिकाणी परीक्षा होतील

शाळेचे मुख्याध्यापक किंवा कॉलेज चे प्राचार्य हे या जनजागृती अभियान राबवण्यासंदर्भात आणि अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना पहिल्या दिवशी करतील. तर विद्यार्थ्यांनी कॉपी केल्यास कोणत्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागणार याची जाणीव शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतील. या शब्दात कॉपीमुक्त घोषवाक्यसह शाळा परिसरात जनजागृती फेरी सुद्धा काढली जाईल, त्यानंतर सर्व विद्यार्थी कॉपीमुक्त अभियानासाठी शपथ घेणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

हॉल तिकीट बदलामुळे परीक्षेत बदल होणार का

राज्यातील दहावी बारावीचे हॉल तिकीट हे नव्याने देण्यात येणार आहेत दहावीचे वाटप झाले आहेत परंतु बारावीचे 23 तारखेपासून वाटप होणार आहेत यामुळे आता परीक्षा पद्धतीत काही बदल होणार का तर यावर स्पष्टीकरण देताना बोर्डाने सांगितलेला आहे की परीक्षेत कुठलाही प्रकारचा बदल होणार नाहीये परीक्षा आहेत त्याच वेळेत होणार आहेत फक्त कास्ट प्रवर्ग हा हॉल तिकीट मध्ये बदल करण्यात आलेला आहे

वरील लेखनात आपण दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कुठली आनंदाची बातमी आहे ही पाहिले आहे दहावी बारावी बोर्ड नोट्स साठी 9322515123 या नंबर वर संपर्क करा आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

.

Leave a Comment