WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC good news 2025 दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बोर्डाचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC good news 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे बोर्डाने अचानक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे ती कुठली आहे कशाप्रकारे कोणता निर्णय आहे याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

SSC HSC good news 2025 पूर्ण माहिती

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच काही दिवसांवर आलेला आहे यामध्ये आता बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे कारण यामध्ये विद्यार्थ्यांच्या विचार केलेला आहे नक्कीच यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होईल बोर्डाचा हा निर्णय खूपच चांगला आहे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे

बोर्डाचे यावर्षी घेतलेले काही निर्णय
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत यावर्षी काही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले जसे की हॉल तिकीट वर कास्ट याचा उल्लेख करणे नंतर तो निर्णय बदलण्यात आला त्यानंतर परीक्षा केंद्रावर शिक्षकांची अदलाबदली चा निर्णय तो देखील निर्णय थोडासा सौम्य करण्यात आला त्यानंतर प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बंधनकारक असणे हा निर्णय एकदम महत्त्वाचा आहे

राज्यात कॉफी मुक्त परीक्षा अभियान
राज्यात दहावी बारवी बोर्डाच्या परीक्षा साला दर साला प्रमाणे चालतात परंतु यामध्ये काही गैरप्रकार होतात या गैरप्रकारे ला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकार त्याचप्रमाणे बोर्डाने राज्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवलेल्या आहेत यामुळे राज्यातील परीक्षा या पारदर्शकपणे पार होतील आणि त्यामुळे या परीक्षा सुरळीत होतील.

बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या दडपणाखाली असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्य शालेय शिक्षण मंडळाने ऑनलाइन समुपदेशनाची सुविधा सुरू केली आहे. या समुपदेशाने विद्यार्थाना आलेलं टेन्शन , नैराश इत्यादी गोष्टीतून बाहेर काढले जाणार आहे. ज्यामुळे विद्यार्थाना व्यवस्थित परीक्षा देता येणार आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क समुपदेशन –
समुपदेशक विद्यार्थ्यांना व पालकांना परीक्षा संबंधित मानसिक दडपणावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क समुपदेशन दिले जाईल. या सेवेचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या मानसिकतेवर ताण कमी करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी करावा, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. माधुरी सावरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा –
राज्य मंडळाने 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत इयत्ता बारावी आणि 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जातील.

भ्रमणध्वनी क्रमांक –
1) 9011302997
2) 8263876896
3) 8767753069
4) 7387400970
5 ) 9960644411
6) 7208775115
7) 8169202214
8) 9834084593
9) 8329230022
10) 9552982115

कोणते प्रश्न विचारू नयेत ?
विद्यार्थी आणि पालकांनी समुपदेशकांना परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था किंवा प्रश्नपत्रिका यासंबंधी प्रश्न विचारू नयेत, असेही त्यांनी सांगितले आहे. शासनाचा हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या समुपदेशन सेवा विद्यार्थ्यांना मानसिक ताण आणि परीक्षेच्या भीतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी या उपक्रमाची आवश्यकता अत्यंत महत्वाची आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.

अशाप्रकारे बोर्डाने कुठला निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी काय आनंदाची बातमी ही आपण पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “SSC HSC good news 2025 दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बोर्डाचा मोठा निर्णय”

Leave a Comment