WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC exam study tips दहावी बारावी बोर्डाचा अभ्यास करताना या टीप्स फॉलो करा मिळतील 99%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC exam study tips लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत यातच सुद्धा काहीतरी मुलांचा अभ्यास झाला आहे काही मुलांचा अभ्यास झाला नसतो तर आज आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे काय टिप्स फॉलो करायचा आहे याची माहिती आपण पाहणार आहोत

अशातच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सुरुवात केली असेलच. परंतु, बरेचदा अभ्यास करायचा असतो पण अभ्यास करावासा वाटत नाही. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे असेल तर मन लावून अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.

SSC HSC exam study tips पूर्ण माहिती

सध्या मुलांचे सगळ्यात जास्त लक्ष असते ते, सोशल नेटवर्किंग वेबसाइट, मित्र, कुटुंब, गोंगाट, ऑनलाइन गेम कडे असते. जर तुमच्या बाबतीही असे घडत असेल तर मुलांनी या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे तुमचे अभ्यासात लक्षही लागेल आणि परीक्षेत (Exam) चांगले गुणही मिळतील.

काही मुलांचे अभ्यास करताना मन लागत नाहीये कुठला विषय करायचा कशाप्रकारे करायचा काही अडचण येते याचीच माहिती आपण घेणार आहोत की विद्यार्थ्यांनी एकाग्र होऊन कशाप्रकारे अभ्यास करून चांगल्या प्रकारे कसं सराव करता येईल याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत.

या टीप्स फॉलो करा मिळतील ९०% SSC HSC exam study tips

  1. अभ्यासाची जागा निवडा

आपण अभ्यासासाठी आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतो. त्यामुळे योग्य जागा निवडणे अधिक महत्त्वाचे असते. अभ्यास करताना वातावरण शांत असायला हवे. बसण्यासाठी चांगली खूर्ची किंवा टेबल असायला हवा. पुस्तके व्यवस्थित ठेवण्याची सोय असावी.

२)विचलित करण्याऱ्या गोष्टींपासून दुर्लक्ष करा

जर तुम्हाला ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ अभ्यास करायचा असेल तर लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. या गोष्टींमुळे तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता आणि अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे अभ्यास करताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा.

३)नीट वाचन करा

अभ्यासक्रम समजून घ्यायचा असेल आणि लक्षात ठेवायचा असेल तर तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम नीट वाचण्याची गरज आहे. जेव्हा अभ्यासाला बसा तेव्हा आपले लक्ष केंद्रित करा. नेहमी सकारात्मक विचारांशी जोडलेले राहा.

४)दैनंदिन अभ्यासाला प्राधान्य द्या

अभ्यासासाठी योग्य नियोजन असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लक्ष केंद्रित कसे करता येईल हे पाहा. रोजच्या अभ्यासासाठी टाईम टेबल चार्ट बनवा, त्यानुसार अभ्यास करा. अभ्यासाला आपल्या आयुष्यातील एक भाग समजा. ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ (Time) अभ्यास करु नका.

५)शिस्तबद्ध नेहमी राहा

अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर शिस्त पाळणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी तुमचे मन दुसरीकडे भरकटू देऊ नका. त्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. तुमच्या टाइम टेबलवर लक्ष केंद्रित करा.

  1. विश्रांती घ्या

कोणतेही काम न थांबता केले तर त्याचे तुम्हाला ओझे वाटू लागते. त्यामुळे अभ्यास करताना विश्रांती घेणे देखील गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचा मेंदू अधिक सक्रिय होईल. दर १ तासांनी ब्रेक घ्या.

  1. प्रगतीचा आढावा घ्या.

अभ्यासाची पद्धत सुधारण्यासाठी तुमच्या प्रगतीचा आढावा घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमची प्रगती तपासा. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करुन यशस्वी (Success) व्हाल.

  1. अभ्यासाची शैली तपासा

सर्व विद्यार्थ्यांनी आपली अभ्यासाची शैली तपासणे गरजेचे असते. काहींचा अभ्यास हा सकाळी चांगला होतो तर काहींचा रात्रीच्या वेळी. त्यासाठी अभ्यासाची योग्य वेळ ठरवून घ्या.

९)सकस आहार

निरोगी राहाण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी चांगला आहार महत्त्वाचा आहे. चांगली फळे, भाज्या, धान्ये खाल्ल्याने मेंदू तल्लख होण्यास मदत होते. पौष्टिक आणि संतुलित आहारामुळे अभ्यासातही मदत होते

१०) गणित इंग्रजी या विषयावर जास्त भर द्या SSC HSC exam study tips

विद्यार्थ्यांना सर्वात अवघड विषय हा गणित असतो यासाठी वेळोवेळी सराव करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे इंग्लिश हा विषय देखील भरपूर मुलांना अवघड असतो त्यामुळे यातील रायटिंग स्किल याचा सराव करणे हे देखील खूप गरजेचे आहे

११)पुरेशी झोप घ्या

आपली झोप चांगली झाली असेल तर आपल्याला अभ्यासावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवता येते. चांगल्या झोपेमुळे हार्मोन्स योग्यरित्या नियंत्रित केले जाते. त्यामुळे ७ ते ८ तास पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

वरील लेखनात आपण दहावी बारावी बोर्डाचा विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करावा आणि त्यांना चांगल्या प्रकारे कसे मार्क मिळतील याचीच माहिती आपण घेतले आहे तरी सर्व अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment