SSC HSC board good news आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत यातच आता दोन विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे बोर्डाकडून आता विद्यार्थ्यांना मोफत गुण मिळणार आहे याचे पूर्ण माहिती घेणार आहोत की कुठल्या विद्यार्थ्यांना घेऊन मिळणार आहेत कशाप्रकारे मिळणार आहेत आणि कुठे मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होईल पूर्ण माहिती बघूया
SSC HSC board good news पूर्ण माहिती
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षेत कला, चित्रकला, क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह एनसीसी, स्काऊट व गाईडमधील सहभागाबद्दल सवलतीचे गुण दिले जातात. आता यात ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमात सहभागाबद्दल ही सवलतीचे गुण देण्याचा विचार होतो आहे. तसा प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठविण्यात आला आहे
SSC HSC board good news अशाप्रकारे पाच गुण मिळणार
दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले जातात त्याच्यामध्ये क्रीडा असेल त्याचप्रमाणे त्यांना अतिरिक्त कला गुण असे सवलतीचे गुण दिले जातात परंतु आता या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना पाच गुण मिळणार आहेत यामध्ये त्यांना निरक्षर लोकांना साक्षर करायचे आहे जर त्यांनी त्या प्रकारे त्या लोकांना साक्षर केलं तर त्यांना आता हे अतिरिक्त पाच गुण मिळणार आहेत त्यामुळे नक्कीच बोर्ड विद्यार्थ्यांना एक चांगली आनंदाची बातमी आहे
दहावी, बारावी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा गुणांसह आता निरक्षरांना साक्षर करण्यासाठीही सवलतीचे गुण मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्वयंसेवकाने किमान पाच निरक्षरांना साक्षर केले, तर पाच गुण मिळतील. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शिक्षण संचालनालय (योजना) यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पाठवला आहे.
साक्षरता मोहिमेत निरक्षरांना पाच टप्प्यांत शिक्षण दिले जाणार आहे. यात पायाभूत साक्षरतेचा पहिला टप्पा असून त्यात लेखन, वाचन, संख्याज्ञान याचा समावेश आहे. यानंतर जीवन कौशल्य विकास असेल. ज्यामध्ये आर्थिक, कायदेविषयक साक्षरतेवर भर राहील. यानंतर मुलभूत शिक्षण, व्यावसायिक कौशल्य प्राप्ती आणि निरंतर शिक्षण आहे. शिक्षक गावात सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करतात.
या निरक्षरांना साक्षर करण्याचे काम स्वयंसेवक करतात. आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी हे काम करतात. त्यांच्या या कामासाठी सवलतीचे गुण दिले तर शंभर टक्के सहभाग मिळेल. आणि पालकही सहभागी होतील, असे शिक्षण विभागाला वाटते. एका स्वयंसेवकाला अधिकाधिक पाच गुण दिले जातील. त्यासाठी किमान त्याला पाच निरक्षरांना साक्षर करावे लागेल, अशी अट असेल.
बोर्डाने यावर्षी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत तसे हॉल तिकीट वर देखील मुलांच्या कास्ट चा उल्लेख केला होता परंतु आता तो विरोध केल्यामुळे बदलण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे हा देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे यामध्ये विद्यार्थ्यांना राज्यातील जनताजी निरीक्षण आहे त्याला साक्षर करताना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना ट्रेनिंग दिले जाईल त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत त्या त्या प्रकारे विद्यार्थी हे टप्पे पूर्ण करेल त्या विद्यार्थ्यांना नक्कीच एकूण मिळणार आहे
विद्यार्थ्यांना होणार फायदाSSC HSC board good news
विद्यार्थ्यांना जर हे पाच गुण राज्यातील नागरिकांना साक्षर करून मदत असतील तर नक्कीच या पाच गुणांचा एक सरासरी टक्का बनतो आणि एक टक्क्यामुळे त्यांचं पुढील डिप्लोमा असेल आयटीआय असेल इंजिनिअरिंग असेल सायन्स कॉमर्स या चांगल्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन होऊ शकतं आणि या गुणांचा वापर करून ते चांगल्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात.
राज्यात शिक्षण संचालनालय योजना कार्यालयाकडून ‘नवभारत साक्षरता’ उपक्रमासह ३९ योजना, उपक्रम राबविले जातात. साक्षरता उपक्रमात शिक्षकांचा प्रतिसाद नगण्य आहे. शिक्षकांचा सहभाग कमी असल्याने निश्चित उद्दिष्ट साध्य होणे अवघड ठरण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये निरक्षरांची संख्या नेमकी किती याबाबत स्पष्टता नाही.
२०११ मधील जनगणनेनुसार राज्यभरात १ कोटी ६२ लाखांपेक्षा अधिक निरक्षर असल्याचे सांगण्यात येते. २०३० पर्यंत सर्वांना साक्षर करण्याचे उल्लास नवभारत साक्षरता मोहिमे अंतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आले. परंतु शिक्षकांचा सहभाग कमी असल्याने उपक्रम अडखळत सुरु असल्याचे सांगण्यात येते.
आता त्यात काम करणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभाग ‘सवलतीचे गुण’ यावर विचार करत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे नुकताच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आता तो राज्य सरकारकडे जाईल. आणि धोरणात्मक निर्णय होईल, असे सांगण्यात येते.
तर अशाप्रकारे आपण बघितलं की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पाच गुण हे अतिरिक्त मिळणार आहेत याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या नंबर वर संपर्क करा आणि आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा