WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 दहावी बारावी बोर्ड परीक्षा कडक होणार! बोर्डाचा मोठा निर्णय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे दहावी बारावी बोर्ड परीक्षा जवळ आलेले आहेत त्यात आता बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

बोर्डाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे कारण या वर्षी बोर्डाचे पेपर हे कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डाने अनेक मोठे बदल हे केले आहेत यामुळे यावर्षी परीक्षा ह्या जरा अवघड असू शकतात..

SSC HSC board exam 2025 पूर्ण माहिती

दहावी-बारावीच्या परीक्षेत आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या केंद्राव्यतीरिक्त अन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करावी, असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे.

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रकटनाद्वारे माहिती दिली. या दोन्ही परीक्षांसाठी राज्यातून सुमारे ३१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

तसेच यावर्षी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी ज्या सेंटरवर सीसीटीव्ही हे असतील आणि चालू असतील त्या शाळांना सेंटर देण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाने दिलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी यावरती भरपूर अभ्यास करावा लागणार आहे यावर्षी कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाने काही कठोर पावले उचललेले आहेत

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २० ते २६ जानेवारी दरम्यान ‘कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह’ आयोजित केला आहे.

राज्यात दहावी-बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये एकूण सुमारे ३१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान, कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने हे आदेश दिले आहेत. सध्याच्या पद्धतीनुसार परीक्षा केंद्रावर त्याच शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक हे परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कामे करतात. आत यंदापासून यात बदल होणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित कर्मचारी अन्य शाळांतून नियुक्त करण्याचा निर्णय राज्यस्तरावरून पहिल्यांदाच घेण्ात X आल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांन। सांगितले.

कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी बोर्डाने घेतला मोठा निर्णय SSC HSC board exam 2025

या सप्ताहात कॉपीमुक्त अभियानाची शाळास्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक यांना माहिती देणे, कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेणे, कॉपी केल्यास होणाऱ्या शिक्षेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे, परीक्षा काळातील आहार, आरोग्याच्या काळजीबाबत तज्ज्ञांद्वारे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग, तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे, उत्तरपत्रिका कशा लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, कॉपीमुक्त अभियानाबाबत जनजागृती फेरी, ग्रामसभा असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वरील लेखनात आपण दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा कशा प्रकारे होणारे याची माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment