WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 दहावी बारावी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गुन्हा दाखल होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत यामध्ये आता बोर्डाचे वेगवेगळे निर्णय येत आहेत यामध्ये सुद्धा एक सर्वात मोठा निर्णय आलेला आहे परीक्षा केंद्रावर जर गैरप्रकार घडला तर गुन्हा दाखल होणार आहे नेमकं काय बातमी आहे याची माहिती आपण पाहणार आहोत

SSC HSC board exam 2025 पूर्ण माहिती

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत यामध्ये आता विद्यार्थी पालकांच्या चिंता होणाऱ्या आणखीन एक बातमी समोर येत आहे बोर्डाने यावर्षी असे काही निर्णय घेतलेले आहे त्यामुळे नक्कीच या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे
बोर्डाने आत्ताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे जर परीक्षा केंद्रावर काही घर प्रकार घडल्यास विद्यार्थी त्याचप्रमाणे तिथेच असणारे शिक्षकांच्यावर गुन्हा दाखल होणार का नेमकं काय बातमी आहे आपण बघूया

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) ११ फेब्रुवारी ते १८ मार्च व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी दिला आहे.

शिक्षण विभागाचे महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बारावी व दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीद्वार बैठक घेण्यात आली.

या दूरचित्र प्रणालीमध्ये मुख्य सचिव यांनी यावर्षी होणाऱ्या बारावी व दहावी परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे : राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेसीयल रिकगनायझेशन यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल.

परीक्षा दरम्यान 144 कलम लागू

परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येईल. महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंध कायदा १९८२ या कायद्याची अंमलबजावणी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास, गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

सर्व उपाययोजना करण्यात येणार असून, याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटक यांनी नोंद घ्यावी.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या व्यक्तींवर दहावी बारावीच्या परीक्षेत जर काही प्रकार घडला तर गुन्हा दाखल होणार आहे याची माहिती आपण पाहिली. दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment