SBI repo rate आज आपण पाहणार आहोत की राज्यातील SBI बँक धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे यामुळे बँक धारकांसाठी आनंदाची बातमी आहे ही आनंदाची बातमी कुठली आहे का आहे नेमका बँकेने काय निर्णय घेतलेला आहे बघुयात माहिती
SBI repo rate संपूर्ण माहिती
राज्यातील एसबीआय बँक धारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे एसबीआय बँक म्हणजे आपल्या देशातील सर्वात विश्वसनीय आणि सुरक्षित बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक ऑफ इंडिया मध्ये भरपूर ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत आणि सोयी सुविधा देखील चांगले आहेत त्यामुळे ग्राहकांना नक्कीच एक मोठा दिलासा देणारी बातमी त्यांनी दिलेली आहे तरी याविषयी आपण माहिती बघणार आहोत.
SBI repo rate देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या कर्जावरील व्याजदर ५० बेसिस पॉइंटने कमी केले आहेत. यामुळे या बँकेचे कर्ज घेतलेले विद्यमान कर्जदार आणि नवीन कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच यामुळे एसबीआयकडून कर्ज घेणे आता स्वस्त होईल.
या नवीन बदलामुळे एसबीआयचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) आता ७.७५ टक्के झाला आहे, तर त्याचा एक्स्टर्नल बेंचमार्क आधारित लेंडिंग रेट (EBLR) ८.६५ टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
‘आरएलएलआर’ हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी निगडित एक्स्टर्नल बेंचमार्क आहे. आरबीआयने रेपो दरात बदल केल्यास या दरातही बदल केला जातो.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही बदल १५ जून २०२५ पासून लागू राहतील.
याशिवाय, एसबीआयने विविध मॅच्युरिटी कालावधीच्या ३ कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात २५ बेसिस पॉइंटची कपात करण्यात आली आहे. हे सुधारित मुदत ठेवींचे दरदेखील १५ जूनपासून लागू होतील.
असा राहील ठेवीवरील व्याजदर
नवीन बदलांनुसार, १ ते २ वर्षांच्या टर्म डिपॉझिटवरील व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६.५० टक्क्यांवर आणला आहे, तर २ ते ३ वर्षांच्या ठेवींवर आता ६.४५ टक्के व्याज मिळेल. ३ ते ५ वर्षांच्या एफडीवर ६.३० टक्के व्याजदर निश्चित केला आहे. तर ५ ते १० वर्षांच्या ठेवींवर ६.०५ टक्के व्याजदर मिळेल.
६ जून रोजी आरबीआयने जाहीर केलेल्या पतधोरणात बेंचमार्क रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सनी कपात केली होती. ही चार वर्षांतील सर्वात मोठी कपात आहे. यामुळे रेपो दर ५.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
अशाप्रकारे आपण बघितलं गेस बियाणे ग्राहकांसाठी कोणते आनंदाची बातमी दिली याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा