Post Office Scheme 2025 आज आपण पाहणार आहोत की पोस्ट ऑफिसच्या योजनेमधून आपल्याला 31 लाख रुपये कसे मिळतील यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत नेमका अर्ज कोठे करायचा गुंतवणूक किती करायची याची माहिती पाहूया
Post Office Scheme 2025 पूर्ण माहिती
आपण आपल्या पैशांची योग्य ठिकाणी जर गुंतवणूक केली तर त्याचा परतावा देखील आपल्याला चांगला मिळतो पण आजच्या घडीला भरपूर असुरक्षित व्यवहार होत असतात त्यामुळे भरपूर लोकांना याचा तोटा देखील झालेला आहे परंतु पोस्टाच्या अशी एक योजना आहे या पोस्टाच्या योजनेत जर तुम्ही पैसा लावला तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल शिवाय पोस्ट ऑफिस म्हणजे आपल्या भारतातील सर्वात सुरक्षित घर आहे या ठिकाणी तुम्ही कितीही पैसा लावला तरी तो मला कशाचीच भीती नाही
Post Office Scheme 2025: जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. आज आपण पोस्टाच्या अशा एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना फक्त व्याजातूनच 31 लाख रुपयाहून अधिकचा लाभ मिळणार आहे.
कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण पोस्टाच्या या योजनेतून फक्त व्याज म्हणून गुंतवणूकदारांना 31 लाख रुपये मिळतात. मित्रांनो आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना. ही योजना फक्त आणि फक्त मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे.
पोस्ट ऑफिसची ही योजना मुलींसाठी आहे कारण राज्य सरकार केंद्र सरकार बेटी बचाव बेटी पढाव अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देखील राबवत आहे राज्य सरकारने देखील मुलींसाठी मोफत शिक्षण केलेले आहे त्याचप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणी आहेत त्यांना महिन्याला दीड हजार रुपये देखील आता देत आहेत या सदर्भात ही योजना पोस्टाची मुलींसाठी आहे याच्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न आणि तिचा चांगला भविष्य घडवण्यासाठी चांगले पैसे मिळतील
योजनेसाठी अर्ज कुठे कराल
महत्वाचे म्हणजे फक्त पोस्ट ऑफिसच नाही तर बँकांमध्ये देखील सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते ओपन करता येते. ही एक सरकारी योजना असून मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. दहा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते ओपन केले जाते.
या योजनेचे खाते हे मुलीचे वय 21 वर्षे कम्प्लीट झाल्यानंतर मॅच्युअर होते. या योजनेतल्या गुंतवणुकीवर सध्या स्थितीला 8.2 टक्के दराने व्याज दिले जात आहे. आता आपण सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी वर किती रक्कम मिळणार याचाच एक आढावा घेणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजनेच्या काही विशेषता
ही एक सरकारी योजना आहे, त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही. यामध्ये गुंतवलेले पैसे हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. बँकेच्या एवढी मधील पैसे बुडू शकतात मात्र यातील पैसे बुडणे अशक्य आहे. या योजनेत तुम्हाला फिक्स्ड आणि गॅरंटीड रिटर्न मिळतो.
खरंतर मुलीच्या नावानं उघडलेलं खातं २१ वर्षांनंतर मॅच्युअर होतं, मात्र जेव्हा तुमची मुलगी १८ वर्षांची होईल आणि तुम्हाला तिचं लग्न करायचं असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही अकाउंट बंदही करू शकता अन यातील पैसे काढू शकता.
याशिवाय आणखी काही वेगळ कारण असेल तर ५ वर्षांनंतर खाते बंद केले जाऊ शकते. लक्षात ठेवा खातं उघडल्याच्या तारखेपासून ५ वर्षानंतरच खातं बंद केलं जाऊ शकतं. पाच वर्षाच्या आत या योजनेचे खाते बंद होऊ शकत नाही.
कसे मिळणार 31 लाखांच व्याज?
पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये आणि कमीत कमी 250 रुपये गुंतवता येतात. या योजनेत पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. या योजनेचे अकाउंट हे 21 वर्षांनी मॅच्युअर होते.
आता जर समजा पोस्टाच्या या योजनेत दरवर्षी एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर 21 वर्षांनी म्हणजेच मॅच्युरिटीवर 46 लाख 18 हजार 385 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम ही फक्त पंधरा लाख रुपये इतके असेल आणि उर्वरित रक्कम ही व्याजाची असेल. अर्थातच 31 लाख 18 हजार 385 रुपये निव्वळ व्याज म्हणून मिळणार आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींची खाती उघडता येतात. मात्र, ज्या कुटुंबात जुळ्या मुली आहेत, अशा कुटुंबांमध्येही २ पेक्षा जास्त खाती उघडता येतील.
अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेतून आपल्याला ही पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा