WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ONGC recruitment 2025  ONGC मध्ये मोठी भरती पगार १.८०लाख रुपये आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ONGC recruitment 2025


आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल आणि यासाठी आपल्याला काय करावे लागेल अर्ज कुठे भरायचा याची माहिती पाहणार आहोत

ONGC recruitment 2025 पूर्ण माहिती

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने 100 पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. AEE आणि भूभौतिकशास्त्रज्ञ या पदांसाठी ही भरती आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूश खबर आहे. ऑयल अँड नॅचुरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने 100 हून अधिक पदांसाठी भरती सुरू केली आहे. एईई (AEE) आणि जियोफिजिसिस्ट या पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे. तर, परीक्षा 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. या भरतीद्वारे ओएनजीसीमध्ये एकूण 108 पदे भरली जातील. त्यामुळे तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर त्वरीत अर्ज करा.

ही पदे भरली जाणार. ONGC recruitment 2025

जियोलॉजिस्ट – 5 पदे
जियोफिजिसिस्ट (भूतल) – 3 पदे
जियोफिजिसिस्ट (वेल्स) – 2 पदे
एईई (प्रॉडक्शन) – मेकॅनिकल – 11 पदे
एईई (प्रॉडक्शन) – पेट्रोलियम – 19 पदे
एईई (प्रॉडक्शन) – केमिकल – 23 पदे
एईई (ड्रिलिंग) – मेकॅनिकल – 23 पदे
एईई (ड्रिलिंग) – पेट्रोलियम – 6 पदे
एईई (मेकॅनिकल) – 6 पदे
एईई (इलेक्ट्रिकल) – 10 पदे

पात्रतेचे निकष काय?  ONGC recruitment 2025 शैक्षणिक पात्रता.

जियोफिजिसिस्ट (भूतल) पदासाठी

जियोलॉजीमध्ये किमान 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा पेट्रोलियम जिओसायन्समध्ये किमान 60 टक्के गुणांसह MSc किंवा MTech डिग्री असावी.

एईई पदांसाठी संबंधित विषयामध्ये किमान 60 ट्क्के मार्क्ससह पदवी असावी.

ONGC recruitment 2025 वयोमर्यादा.

या पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 26 वर्षे ते 42 वर्षे दरम्यान असावी, तर राखीव श्रेणीसाठी नियमावलीनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये आहे, तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी श्रेणीसाठी अर्ज शुल्क माफ आहे. शुल्क ऑनलाइनद्वारे भरता येतील.

निवड प्रक्रिया. अशी असेल ONGC recruitment 2025

ओएनजीसीत या पदांसाठी कॉम्प्युटर आधारित परीक्षे (ऑब्जेक्टिव्ह प्रकार) द्वारे निवडीची प्रक्रिया होईल. या परीक्षेत 4 सेक्शन असतील. सामान्य ज्ञान, संबंधित विषय, इंग्रजी भाषा, आणि 2 तासांच्या कालावधीत एक एप्टीट्यूड चाचणी. ओएनजीसीसाठी स्कोअरच्या आधारावर इंटरव्ह्यूसाठी 1:5 प्रमाणात उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. अधिक शॉर्टलिस्टिंगसाठी ग्रुप डिस्कशन प्रक्रिया केली जाईल.

पगार किती? असणारं

ओएनजीसीमध्ये जियोफिजिसिस्ट आणि एईई पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 60,000 ते 1,80,000 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. त्याचप्रमाणे, त्यांना इतर भत्तेही दिले जातील. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी ओएनजीसीच्या ongcindia.com या अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधावा.

वरील लेखनात आपण या नोकरी विषयी पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..

Leave a Comment