Mofat tablet yojana आज आपण पाहणार की दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे त्यांना दररोज सहा जीबी इंटरनेट आणि मोफत टॅबलेट मिळणार आहे यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील याविषयी आपण माहिती बघणार आहोत
Mofat tablet yojana संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेअंतर्गत जवळपास मोफत टॅबलेट आणि दररोज सहा जीबी इंटरनेट यासाठी त्यांना काय करायचंय किती तारीख लागणार आहे वसा अर्ज करायचा कागदपत्र काय लागणार आहेत या टॅब चा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षणा जीवनात भरपूर त्याचा फायदा होईल याविषयी पूर्ण माहिती बघूयात
Mofat tablet yojana महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2025-27 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.
योजनेच्या लाभासाठी पात्रता खालील प्रमाणे (अ) :
1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी
2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी
3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी
4) जे विद्यार्थी सन 2025 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे.
5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.(Mahajyoti Registration)
6) विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
7) विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
8) अर्जदार विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा ग्रामीण भागातील म्हणजेच खेळ्या गावातील असा तर 60% च्या पुढे गुण पाहिजे, तर शहरी भागातील असाल तर 70% च्या पुढे टक्के पाहिजे. तरच अर्ज करा
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (ब) :-
1) 10 वी ची गुणपत्रिका
2) 11 वी सायन्स घेतल्याचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट)
3) आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)
4) रहिवाशी दाखला/डोमासाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate)
5) जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
6) वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)
7) दिव्यांग असल्यास दाखला
8) अनाथ असल्यास दाखला
अर्ज कसा करावा (क) :-
1) महाजोतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.
2) आता Application for MHT-CET/JEE/NEET-2025-27 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
3) अर्जासोबत ‘ ब ‘ मध्ये नमूद कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://neet.mahajyoti.org.in/2025/mobile_verification.php
अशाप्रकारे आपण बघितलं की महाज्योती टॅब योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि दररोज सहा जीबी इंटरनेट याची माहिती घेतली आहे