Lakpati didi yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांना पाच लाख रुपये मिळणारे कोणत्या महिलांना मिळणार कशामुळे मिळणार अर्ज कसा करायचा पात्रता काय असतील कागदपत्र कोणते लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.
Lakpati didi yojana संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे कारण महिलांच्या सक्षमी करण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकार हे नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असतात यामध्ये तुम्ही बघितला असेल की महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना त्याचप्रमाणे माजी कन्या भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना या सगळे योजनांच्या मार्फत राज्य सरकार महिलांच्या सक्षमी करण्यासाठी त्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना हातभार मदत करत असतं त्याचप्रमाणे केंद्र सरकार देखील लखपती दिली योजना राबवत आहे या अंतर्गत राज्यातील देशभरातील महिलांना पाच लाख रुपये मिळणार आहेत यासाठी त्यांना काय करावे लागेल याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.
Lakpati didi yojana केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहे. केंद्रासोबतच विविध राज्य सरकारनेदेखील योजना राबवल्या आहेत. दरम्यान, केंद्राची लखपती दीदी योजना ही खूप लोकप्रिय आहे. लखपती दीदी योजनेत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. याचसोबत लखपती दीदी योजनेत १ लाख ते ५ लाखांचे कर्ज दिले जाते.
लखपती दीदी योजना
लखपती दीदी या योजनेत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय हे लोन दिले जाते. या योजनेत महिलांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करावा. त्यांना रोजगार मिळावा, याचसोबत इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी, हे यामागचे उद्दिष्ट आहे.
लखपती दीदी योजनेत कर्जासोबतच स्किल डेव्लपमेंट ट्रेनिंग प्रोगामअंतर्गत ट्रेनिंगदेखील दिले जाते. महिलांना स्किल ट्रेनिंग देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अनेक क्षेत्रातील प्रोफेशनल ट्रेनर्सकडून प्रशिक्षण दिले जाते. ही योजनेत बचत गटातील महिला लाभ घेऊ शकतात.
लखपती दीदी योजनेत कोट्यवधि महिलांनी लाभ घेतला आहे. महिलांना स्किल ट्रेनिंगसोबतच आर्थिक मदत दिली जाते. १ ते ५ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत कर्जावर कोणतेही व्याजदर आकारले जात नाही.
लखपती दीदी योजना पात्रता
लखपती दीदी योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या लाभार्थी महिला या भारतातील कोणत्याही राज्याच्या रहिवासी असाव्यात. तसेच महिला बचत गटाशी जोडलेल्या असणे आवश्यक आहे. महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आणि बिझनेस प्लान जमा करावा लागेल. यानंतर अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रुफ हे कागदपत्रे आवश्यक आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील महिलांना 5 लाख रुपये कसे मिळणार आहे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा