WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Credit Card loan तुम्हाला 5लाख कर्ज मिळणार केवळ ४%दराने पाहा अर्ज कसा आणि कुठे करायचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Credit Card loan आज आपण पाहणार आहोत की तुम्हाला कशाप्रकारे पाच लाख खर्च मिळणार यासाठी अर्ज कसा करायचा कोठे करायचा पात्रता काय असणार या संपूर्ण विषयाची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

Kisan Credit Card loan पूर्ण माहिती


देशाचा अंतरिम बजेट हा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी जाहीर केला त्यांनी बजेट जाहीर केला आणि सर्व सामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली सर्व सामान्यांसाठी बारा लाख पर्यंत टॅक्स मोफत केला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड याचे मर्यादा हे पाच लाखापर्यंत करण्यात आली. यामुळे आता हे पाच लाखांचे कर्ज तुम्हाला कसे मिळणार कुठे मिळणार याचीच माहिती आपण घेणार आहोत यासाठी तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असायला पाहिजे

Kisan Credit Card loan अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ५ लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला अवघ्या ४ टक्के व्याजदराने मिळते. तुम्हालाही हे कर्ज घेण्याची इच्छा असेल तर कुठे अर्ज करायचा? यासाठीची प्रक्रिया काय आहे? चला जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्डसाठी कोण पात्र आहे?

कृषी कामाव्यतिरिक्त मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, पशुपालन आणि फलोत्पादनात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभमिळतो. यासाठी काही आवश्यक पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. जसे भारतीय नागरिक असणे आणि शेतकऱ्याचे वय १८ ते ७५ वर्षे इत्यादी.

किसान क्रेडिट कार्ड कुठे मिळते?

किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला सरकारी, खाजगी बँका, ग्रामीण बँका किंवा सहकारी संस्थांकडे अर्ज करावा लागतो. किसान क्रेडिट कार्ड ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीसाठी अर्ज करता येतो. शेतकरी त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरू शकतात. अर्जासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड, जमिनीची कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

शेतकरी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर किंवा संबंधित बँकेच्या वेबसाइटवरूनही ऑनलाइन अर्ज करू शकतात. आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची चरण-दर-चरण प्रक्रिया सांगत आहोत.

किसान क्रेडिट कार्डच्या व्याजदरावर सरकारचे अनुदान

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत, सध्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते, जे आता बजेटमध्ये ५ लाख रुपये करण्यात आले आहे. केसीसीचा व्याज दर वार्षिक ७ टक्के आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार व्याजावर सबसिडी देते. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना ३% व्याज अनुदान मिळते. म्हणजे प्रत्यक्षात फक्त ४% व्याजाने तुम्हाला वर्षभर ५ लाख रुपये वापरायला मिळणार आहे.

कर्ज फेडण्याची मुदत?

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना ५ वर्षांसाठी कर्ज मिळते. पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण होते. शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्डवर वर्षातून दोनदा व्याज भरावे लागते. वर्षातून एकदा त्याला संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह जमा करावी लागते. मूळ जमा केलेली रक्कम शेतकरी दुसऱ्याच दिवशी काढू शकतो. वर्षातून दोनदा व्याज भरल्यानंतर आणि संपूर्ण कर्जाची रक्कम एकदाच जमा केल्यानंतरच शेतकऱ्याला व्याज अनुदान मिळते. जर त्याने असे केले नाही तर त्याला ७ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. व्याज वेळेवर न भरल्यास खाते NPA देखील होऊ शकते.

अशाप्रकारे आपण पाहिलं की आपल्याला कशा पकारे पाच लाखांचे कर्ज हे मिळवता येईल यासाठी काय करता येईल याची संपूर्ण माहिती बघितली आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा.

Leave a Comment