Hafta Ladaki may आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा झालेले आहेत कोणत्या लाडक्या मुलींच्या खात्यावर झालेल्या आहेत आणि आपल्याला काय अपडेट मिळालेले आहे याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा झाले आहेत पाहूया संपूर्ण माहिती.
Hafta Ladaki may संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आतापर्यंत दहा हप्ते मिळाले होते परंतु अकरावा हप्ता अद्याप देखील मिळाला नव्हता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता अद्याप देखील खात्यावर जमा नव्हता परंतु या संदर्भात महाराष्ट्राच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाचे अपडेट दिली आहे ती म्हणजे अकरावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत तर काही लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज घेणार आहोत.
Hafta Ladaki may मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिलेली होती. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. यासंदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.
आदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट
लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आज पासून सुरुवात झाली आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.
लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 मे रोजी देण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अकराव्या हप्त्याच्या रकमेसह लाडक्या बहिणींना योजना सुरु झाल्यापासून 16500 रुपये मिळाले आहेत. काही महिन्यांमध्ये दोन महिन्यांची रक्कम लाडक्या बहिणींना एकत्रितपणे देण्यात आली होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम एकत्रित देण्यात आली होती.
या महिलांना मिळतात केवळ 500 रुपये
लाडक्या बहिणींना सरकार योजनेनुसार 1500 रुपये देतं मात्र ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांची रक्कम दिली जाते. मे महिन्याच्या हप्त्यासह 11 हप्त्यांची रक्कम महिलांना मिळाली आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी कोणती महत्त्वाची आनंदाची बातमी दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा