WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free hospital Maharashtra या रुग्णालयात नागरिकांना मोफत उपचार होणार आनंदाची बातमी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free hospital Maharashtra आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या रुग्णालयात नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत कोणत्या नागरिकांना मिळणारे यासाठी त्यांना काय करावे लागेल या संपूर्ण विषयाची माहिती पाहणार आहोत नेमका महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये ही मोफत उपचार मिळणार आहे बघूया संपूर्ण माहिती.

Free hospital Maharashtra संपूर्ण माहिती


राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोरीत आहे राज्यातील नागरिकांसाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला या रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळणार आहेत या नागरिकांना मोफत उपचार मिळतील त्यामुळे त्यांना या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या सर्व सोयी सुविधा या सर्वांचे सोय केली जाईल आणि त्यांना मोफत उपचार करून चांगले सुविधा मिळतील अशा प्रकारची बातमी आहे तर नेमका कोणत्या रुग्णालयात हे मोफत उपचार मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती बघूया
Free hospital Maharashtra विधी व न्याय विभागाने सोमवारी राज्यातील धर्मादाय रुग्णालयासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना लागू करण्यास सांगितले आहे. तसे झाल्यास सर्वच नागरिकांना धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार मिळण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण ४५६ धर्मादाय रुग्णालये असून त्यापैकी ७६ रुग्णालये मुंबईत आहेत.

विशेष म्हणजे, काही पंचतारांकित रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक उपचार घेऊच शकत नाही इतके उपचार महाग आहे. मात्र किती धर्मादाय रुग्णालये शासनाच्या या योजना लागू करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. सोमवारी धर्मादाय सहआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने धर्मादाय रुग्णालयासाठी काही शिफारशी केल्या होत्या. त्यामध्ये एका शिफारशीनुसार, निर्धन रुग्णनिधी शिल्लक नसल्यामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्याशी संबंधित महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम इत्यादी व अन्य सर्व आरोग्याशी संबंधित योजना लागू कराव्यात, असे सांगितले आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहेत.

विशेष करून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील पंचतारांकित रुग्णालये आहेत ज्याचा समावेश धर्मादाय रुग्णालय वर्गवारीत करण्यात येतो. त्यांनीही महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली तर सर्व नागरिकांना या योजनेंतर्गत मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 
उपचारांचे दर ठरवून दिले आहेत

शासकीय योजना लागू कराव्यात असे सांगण्यात आले आहे; मात्र बंधनकारक करण्यात आलेले नाही. अनेक धर्मादाय रुग्णालयांचा कल या योजना लागू होऊ नये याकडे अधिक असतो. बहुतांश धर्मादाय रुग्णालये शासनाचे दर परवडत नाहीत म्हणून ही योजना घेत नाही. त्यांनी उपचारांचे जे दर ठरवून दिले आहेत, ते फार कमी असल्याची तक्रार होत आहे. महात्मा फुले योजनेतील उपचाराचे दर बदलण्यासाठी आरोग्य विभागाने एक समिती स्थापन केली आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील नागरिकांसाठी मोफत उपचार कोणत्या रुग्णालयात मिळणार आहे याची माहिती आपण बघितले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment