Farmer Loan apply आज आपण पाहणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफी कधी होणार हा प्रश्न एक मोठा आहे याविषयी आज आपण संपन्न माहिती पाहणार आहोत नेमकी कर्जमाफी कोणाची होणार कशाप्रकारे होणार सरकार याबाबत काय विचार करत आहे तर बघूयात संपूर्ण माहिती.
Farmer Loan apply पूर्ण माहिती
राज्यातील शेतकरी किसान वर्ग हा सर्वात महत्त्वाचा वर्ग देशासाठी आहे कारण या देशांमध्ये जय जवान आणि जय किसान अशा प्रकारचा नारा दिला जातो कारण किसान हा आपल्या आर्थिक मजबुतीचा एक मोठा पाय आहे कारण किसान शेतकरी यामध्ये आपल्या देशाचे भरपूर उत्पन्न वाढत असतो आणि आता या शेतकरी अडचणीत आहे कारण त्याची कर्जमाफी आणखीन झाली नाही त्याची कर्जमाफी करण्याची घोषणा माहिती सरकारने केली होती आता या संदर्भातील मोठे अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत की काय अपडेट आहे ते बघुयात पूर्ण माहिती.
Farmer Loan apply मागील दोन तीन वर्षापासून आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न घटलं आहे. परिणामी शेती आतबट्टयाचा धंदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांच्या कर्जाची परतफेड केली नाही. शेतकऱ्यांवर सहकारी आणि मध्यवर्ती बँकांची कर्ज थकली आहेत.
बँकांकडून वसूलीचे प्रयत्न सुरू असले तरी सरकारच्या आश्वासनांमुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. तर बँकांनी कर्जवाटपाला आखडता हात घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा, यासाठी शेतकरी मात्र आग्रही आहेत.
राज्य सरकारने यापूर्वीही राज्यात दोन वेळा कर्जमाफीचा निर्णय घेतला. परंतु त्यातील पात्र लाभार्थी अद्यापही वंचित आहेत. २०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली. परंतु त्यातील ६ हजार कोटीचं वाटप अद्यापही करण्यात आलं नाही.
तसेच २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. परंतु अद्यापही त्यातील ४९ हजारांहून अधिक शेतकरी वंचित आहेत.
तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचे ३४६ कोटी रुपये राज्य सरकारकडे थकलेली आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमाफीसह या रखडलेल्या कर्जमाफीची दारं खुली होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. कारण राज्य सरकारनेच निवडणुकीनंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. परंतु राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची घोर निराशा केली.
राज्यातील शेतकऱ्यांवर थकीत कर्जाचा ३१ हजार कोटींचा बोजा झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु राज्य सरकार मात्र शेतकरी कर्जमाफीवर मौन बाळगून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संभ्रम वाढला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील जे शेतकरी त्यांची कर्जमाफी कधी होणार सरकार काय विचार करत आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिली आहे. तरी आपल्याला काय वाटतं कर्जमाफी कधी होईल आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वापर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी आत्ताच 9322515123या नंबर वर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा