WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric vehicle price इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric vehicle price आज आपण पाहणार आहोत की राज्यातील इलेक्ट्रिकल वाहन घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कोणता आहे त्यामुळे इलेक्ट्रिकल वाहन घेणाऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे याची माहिती आपणास घेणार आहोत इलेक्ट्रिकल वाढ आजच्या युगामध्ये हे अत्यावश्यक झालेला आहे त्याची भरपूर काही कारण नाही त्याची पण देखील आपण माहिती घेऊया

Electric vehicle price संपूर्ण माहिती

राज्यातील इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता इलेक्ट्रिकल वाहन ही काळाची गरज राहिली आहे इलेक्ट्रिकल वाहन घेतल्याने आपल्याला प्रदूषणमुक्त त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारचे गव्हर्मेंटला पीओसी वगैरे चलन कटाव येथे नसते त्यामुळे इलेक्ट्रिकल वाहन सर्वांनी घ्यावे अशा प्रकारचे आव्हान देखील आता राज्य सरकार करत आहे त्यामुळे आता प्रत्येकाने इलेक्ट्रिकल वाण घ्यावे यासाठी सबसिडी देखील प्रत्येक वाहनावर देण्यात आलेल्या नेमकी सबसिडी किती भेटणार आपल्याला कोणत्या वाहनावर आणि प्रदूषणमुक्त होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांचे प्रयत्नशील आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल वाहण्यासाठी टोल फ्री देखील करण्यात आलेला आहे बघूया की काय काय सवलती आहेत सरकारने काय निर्णय घेतलेला आहे संपूर्ण माहिती.

Electric vehicle price महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाने आज ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ जाहीर केले आहे. हे धोरण १ एप्रिल २०२५ पासून ते ३१ मार्च २०३० पर्यंत लागू राहील आणि यापूर्वीच्या धोरणाची जागा घेईल. या नवीन धोरणाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या भरघोस सवलती आणि सबसिडी मिळणार आहे.

कोणत्या इलेक्ट्रिक वाहनावर किती सबसिडी मिळणार:
या धोरणांतर्गत, महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या विविध प्रकारांवर थेट आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे अधिक सोपे आणि परवडणारे होणार आहे.

इलेक्ट्रिक दुचाकी
राज्यात विकल्या जाणाऱ्या पहिल्या १,००,००० (एक लाख) इलेक्ट्रिक दुचाकींसाठी, त्यांच्या मूळ किमतीच्या १०% किंवा कमाल १०,००० रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती सबसिडी म्हणून मिळेल. यामुळे शहरी भागातील प्रवासासाठी दुचाकी हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.

इलेक्ट्रिक तीनचाकी (प्रवासी)
पहिल्या १५,००० (पंधरा हजार) इलेक्ट्रिक तीनचाकी (प्रवासी) वाहनांसाठी, त्यांच्या मूळ किमतीच्या १०% किंवा कमाल ३०,००० रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती सबसिडी म्हणून दिली जाईल. यामुळे रिक्षा आणि इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांचे विद्युतीकरण होण्यास मदत होईल.

इलेक्ट्रिक चारचाकी (खाजगी)
पहिल्या १०,००० (दहा हजार) इलेक्ट्रिक चारचाकी (खाजगी) वाहनांसाठी, त्यांच्या मूळ किमतीच्या १०% किंवा कमाल १,५०,००० रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती सबसिडी म्हणून उपलब्ध होईल. यामुळे खाजगी वाहनधारकांना इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळेल.

इलेक्ट्रिक बसेस (Electric Buses):
सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी, पहिल्या १५०० (पंधराशे) इलेक्ट्रिक बसेसना त्यांच्या मूळ किमतीच्या १०% किंवा कमाल २०,००,००० रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती सबसिडी म्हणून मिळेल. यामुळे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती) सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल.

अशाप्रकारे आपण पहिला की इलेक्ट्रिकल वाहन घेणाऱ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी याची माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment