Atal Pension scheme आज आपण पाहणार आहोत की कोणत्या योजनेतून आपल्याला महिन्याला 5000 मिळतील यासाठी आपल्याला काय करावे लागेल अर्ज कुठे करावा लागेल पात्रता काय असेल आणि नेमकं आपल्याला या योजनेतून पाच हजार रुपये कसे आपल्या खात्यावर जमा होतील याविषयी आपणास संपूर्ण माहिती पाहणार आहोत
Atal Pension scheme संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आपण आपल्या पैशांची गुंतवणूक कुठे ना कुठे करू शकतो तुम्हाला माहिती आहे का अशा ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला महिन्याला पाच हजार रुपये मिळतील नेमक्या कोणत्या योजनेची पाच हजार रुपये मिळतील याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत खूपच चांगली योजना आहे आणि केंद्र सरकारची ही योजना अंतर्गत तुम्हाला सर्व चांगल्या रीतीने आणि चांगल्या प्रकारे हे पैसे मिळणार आहे तर बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती
Atal Pension scheme केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं भवितव्य सुरक्षित केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे अटल पेन्शन योजना (APY). असंघटित क्षेत्रातील लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना सरकारचा एक उपक्रम आहे. एपीवायचंवर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (पीएफआरडीए) देखरेख ठेवते.
अटल पेन्शन योजना १८ ते ४० वयोगटातील सर्व बँक खातेदारांसाठी आहे. ही योजना अशा लोकांसाठी आहे जे आयकर भरत नाहीत. यात निवडलेल्या पेन्शन रकमेनुसार योगदान बदलतं. योजनेत सामील झाल्यानंतर ग्राहकानं दिलेल्या योगदानाच्या आधारे ग्राहकाला वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन मिळेल. या अंतर्गत गुंतवणूकदारांना १००० रुपये किंवा २००० रुपये किंवा ३००० रुपये किंवा ४००० रुपये किंवा ५००० रुपयांच्या किमान मासिक पेन्शनची हमी मिळेल.
या आहेत अटी
ग्राहकाचा अकाली मृत्यू झाल्यास (वयाच्या ६० व्या वर्षापूर्वी मृत्यू) मूळ ग्राहकाचे वय ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जोडीदार उर्वरित कालावधीसाठी ग्राहकाच्या अटल पेन्शन योजनेच्या खात्यात योगदान देत राहू शकतो. देयक पद्धती, ग्राहक मासिक / मासिक देयके त्रैमासिक/ अटल पेन्शन योजनेत तुम्ही सहामाही आधारावर योगदान देऊ शकता.
अटल पेन्शन योजनेतून (एपीवाय) काही अटींसह बाहेर पडता येऊ शकतं. यामध्ये सरकारी सहयोगदान आणि त्यावरील परतावा/व्याज कपातीचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या एकूण ग्राहकांपैकी सुमारे ४७ टक्के महिला आहेत. अटल पेन्शन योजनेअंतर्गत २९ एप्रिल २०२५ पर्यंत ७.६६ कोटींहून अधिक लोकांनी सदस्यता घेतली आहे. अटल पेन्शन योजना (एपीवाय) योजना भारतातील ८ प्रमुख बँकांसह ६० भागधारकांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या योजनेतून आपल्याला महिन्याला 5000 मिळतील याविषयी आपण माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वरती टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा