Anna Bhau Sathe Loan Scheme आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांना सात लाख रुपये कसे मिळणार आहे त्यासाठी त्यांना अर्ज कसा करावा लागेल कागदपत्र कोणते लागतील आणि हे सात लाख रुपये त्यांच्या खात्यात कशी जमा होतील या विषयावर माहिती बघणार आहोत
Anna Bhau Sathe Loan Scheme संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील नागरिकांना आता जवळपास 7 लाख रुपये मिळणार आहेत कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहेत आणि यासाठी आपल्याला ते पैसे घेऊन काय करता येईल आपल्या कुठल्या कामासाठी पैशांचा वापर करू शकतो जसं आपल्याला एखादा व्यवसाय टाकायचा असेल तर सरकारी योजनेच्या मार्फतली तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर नेमकी कोणती योजना कोणत्या समाजाला पैसे मिळणार आणि यासाठी काय करावे लागेल बघूयात माहिती
Anna Bhau Sathe Loan Scheme समाजातील युवक-युवतींसाठी दिलासादायक बातमी महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनांमुळे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास मोठा हातभार लागणार आहे.
सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना आणि अनुदान योजना या तीन महत्वाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या योजनांतर्गत कर्ज मर्यादा वाढवण्यात आली असून लाभार्थ्यांना आता 7 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
पात्रता, योजना आणि अर्ज प्रक्रिया यांची सविस्तर माहिती :
मुंबई शहर आणि उपनगरातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील 18 ते 50 वयोगटातील अर्जदारांना या योजनांचा लाभ मिळू शकतो. बीजभांडवल योजनेत 50,001 ते 7 लाख रुपये पर्यंत कर्ज, थेट कर्ज योजनेत 1 लाख रुपये पर्यंत तर अनुदान योजनेत 50 हजारांपर्यंत प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेसाठी इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह बांद्रा (पूर्व), गृहनिर्माण भवन, रूम नं. 33, मुंबई-400051 या ठिकाणी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा 022-35424395 या दूरध्वनी क्रमांकावर अधिक माहिती मिळवावी.
पूर्वी बीजभांडवल योजनेची मर्यादा 5 लाख रुपये होती, ती आता वाढवून 7 लाख रुपये करण्यात आली आहे. बँक सहभाग 75% वरून 50% इतका कमी करून महामंडळाचा सहभाग 45% करण्यात आला आहे, यामुळे बँकांकडून कर्ज मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे
थेट कर्ज योजनेअंतर्गत आता 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकते. यात 85 हजार रुपये महामंडळाचे कर्ज, 10 हजार अनुदान आणि 5 हजार रुपये लाभार्थीचा सहभाग असतो. गेल्या दोन आर्थिक वर्षांत 1166 लाभार्थ्यांना जवळपास 9.91 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या नागरिकांना सात लाख रुपये मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर करून डाऊनलोड करा