Addmission 11th online आज आपण पाहणार की अकरावी प्रवेश याबाबत विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ती कोणती आहे आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे विषयाची माहिती आपण बघणार आहोत दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी 11 वी प्रवेश कडे वाटचाल करत आहे आणि अकरावीत करू शकतो आज एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आहे बघूया संपूर्ण माहिती
Addmission 11th online संपूर्ण माहिती
राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे राज्य ते यावर्षी दहावी बोर्डाचा निकाल लवकर लावण्यात आला आणि त्यामुळे निकाल लावण्या नंतर विद्यार्थी प्रवेशाकडे वाटचाल करू लागले प्रवेशाकडे वाटचाल करत असताना सुरुवातीलाच काही ना काही अडचणी येत होत्या त्यामुळे ऑनलाइन प्रवेश करतोय या तीन देशासाठी बंद करून परत सुरु केली आणि अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक बदलले आता अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक देखील देण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांचे परत फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत आता भरपूर विद्यार्थ्यांनी किती नोंदणी केलेली आहे आणि आज विद्यार्थ्यांना काम महत्त्वाचा दिवस आहे याविषयी आपणास बघणार आहोत कारण आज ऑनलाईन प्रक्रियेमधल्या पाच जून मध्ये अंतिम तारीख आहे आज तुम्ही दोन वाजेपर्यंत त्याची नोंदणी करू शकतात तुम्ही अध्यात देखील नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करा भव्यात या विषयाची सविस्तर विश्लेषक माहिती
Addmission 11th online इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. 6 मे 2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने 31 मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.
या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना 10 टक्के जागा आरक्षित असतील.
मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे.
राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.
या बदलाच्या अनुषंगाने संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोटामधील पसंतीक्रमआवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक/ विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा यास्तव विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी सुधारित मुदतवाढीसह आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 पर्यंत करण्यात येत आहे.
इयत्ता 11 वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी/ पालक यांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणे राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
2 जूनपर्यंत 10 लाख 85 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
दिनांक 2 जून 2025 रोजी सायंकाळपर्यंत एकूण 10 लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून पुणे विभाग- 1,87,925; मुंबई विभाग- 2,65,900; कोल्हापूर विभाग- 1,07,012; छत्रपती संभाजीनगर विभाग- 1,00,040; नाशिक विभाग- 1,12,108; नागपूर विभाग- 95,210; अमरावती विभाग- 98,359; लातूर विभाग- 58,586 आणि इतर- 61,712 अशी नोंदणी झाली असल्याची माहिती डॉ.पानझाडे यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी ई-मेल आयडी
support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन क्रमांक 8530955564 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं त्या अकरावी सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी काय महत्वाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा
We want NCC in government college….
Can we take admission in NCC college