Aadar card update आज आपण पाहणार आहोत की घरी बसल्या मोबाईलवर आधार कार्ड कसे अपडेट करणारे याविषयी आपणास माहिती पाहणार आहोत आधार कार्ड मध्ये अपडेट करण्यासारखे भरपूर काही गोष्टी असतात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला कोणती प्रोसिजर असते आणि कशाप्रकारे आपण कोणती प्रक्रिया केल्यानंतर आधार कार्ड अपडेट होईल याविषयी माहिती आपण पाहूया.
Aadar card update संपूर्ण माहिती
आधार कार्ड आहे आपला महत्त्वाचा भरून पुरावा आहे कारण आधार कार्ड फक्त राष्ट्रीय पुरावा नसून आपली ओळख देखील आहे आपल्या भारताचे नागरिकत्व असलेला एक मोठा आधार कार्ड पुरावा आहे पण आधार कार्ड वेळोवेळी काही ना काही आपले करावे लागते जसं की आपलं पत्ता असेल वेळोवेळी बदलाव लागतो मोबाईल नंबर मग हे सर्व तुम्हाला करण्यासाठी भरपूर वेळ लागतो परंतु तुम्ही आता मोबाईलवर आधार कार्ड वर सगळ्या गोष्टी अपडेट करू शकता याविषयी आपण माहिती बघूया की सोपी आणि साधी प्रक्रिया कशाप्रकारे तुम्ही मोबाईलवर करू शकता
Aadar card update आधारकार्ड शिवाय तुमचं एकही शासकीय काम होत नाही. इतकचं काय पण खासगी क्षेत्रातही मुख्य ओळखपत्र म्हणून आधारकार्डची मागणी केली जाते. यावरुन त्याचं महत्त्व अधोरेखित होतं. बँकिंग, मोबाईल आणि सरकारी योजना यासारख्या अनेक योजना थेट तुमच्या आधारशी जोडल्या जातात. पण, यासाठी तुमचा अधिकृत मोबाईल नंबर आधाशी लिंक असणे आवश्यक आहे.
कारण, तुमचा मोबाईल नंबर आधारसोबत नोंदणीकृत केल्याने तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित पडताळणी, UPI व्यवहार आणि इतर डिजिटल पेमेंटमध्ये सहज प्रवेश मिळतो. पण जर तुमचा मोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट केला नसेल तर तुम्हाला या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. जर तुमचा नोंदणीकृत नंबर हरवला असेल किंवा कोणत्याही कारणास्तव तुमचा फोन नंबर बदलला असेल, तर तुम्ही तो ऑनलाइन देखील अपडेट करू शकता.
आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची आवश्यकता का?
आधारमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणे खूप महत्वाचे आहे. ऑनलाइन व्यवहारांसाठी आणि आधार-आधारित पडताळणीसाठी OTP मिळवणे. आधारशी जोडलेल्या सरकारी योजनांमध्ये प्रवेश करणे आणि तुमच्या आधारशी जोडलेल्या खात्यांचे अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण करणे महत्वाचे आहे. यासाठी सक्रीय असलेला मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
आधारमध्ये मोबाईल नंबर बदलण्याची ऑनलाइन प्रक्रिया
अधिकृत UIDAI पोर्टल https://www.uidai.gov.in/ ला भेट द्या आणि सेल्फ-सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) वर जा.
तुम्हाला अपडेट करायचा असलेला नोंदणीकृत फोन नंबर एंटर करा.
‘OTP पाठवा’ वर क्लिक करा, प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि पुढे जा.
‘ऑनलाइन आधार सेवा’ मेनूमधून, तुम्हाला अपडेट करायचा असलेला पर्याय निवडा (या प्रकरणात तुमचा मोबाइल नंबर)
आवश्यक माहिती द्या आणि तुमचा फोन नंबर सबमिट करा.
कॅप्चा व्हेरिफिकेशन : दिलेला सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि पुढे जा.तुमच्या नवीन मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करा.पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, ‘सेव्ह करा आणि पुढे जा’ वर क्लिक करा.
वर नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर, आधार नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट घ्या आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट द्या. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि विहित शुल्क भरण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे द्या.
अशाप्रकारे आपण पहिला की घरी बसल्या मोबाईलवर आपण आधार कार्ड कसे अपडेट करू शकतो याची माहिती मिळवली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा