WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CET EXAM UPDATE सीईटी परीक्षा पद्धतीत मोठा बदल विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CET EXAM UPDATE आज आपण पाहणार की सीईटी परीक्षा पद्धतीत कोणता बदल झालेला आहे याविषयी माहिती बघणार आहोत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर येत आहे सीईटी परीक्षा अर्थातच विद्यार्थ्यांचे जीवनातील महत्त्वाची परीक्षा असते या परीक्षेत बदल झाल्यामुळे आता काय महत्त्वाचा बदल आहे याविषयी माहिती घेऊया

CET EXAM UPDATE संपूर्ण माहिती

आज आपण पाहणार आहोत की सिटी परीक्षा जी असते कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये काय बदल झालेला आहे फक्त आपण परत ठिकाणी बघत असतो की जे सीईटी परीक्षा असते बारावी झाल्यानंतर आपल्याला सिटी परीक्षा मेडिकल आणि इंजिनिअरिंग साठी द्यावी लागते किंवा आणखीन पण आपल्याला कुठल्या ज्या काही शिक्षणा प्रक्रियेमध्ये सीईटी परीक्षा लागत असतात काय बदल झालेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे बघूया त्याविषयी माहिती.

CET EXAM UPDATE राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी, एमबीए, आर्किटेक्चर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत या वर्षीपासून लागू केलेल्या नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अपेक्षेपेक्षा वेगळे महाविद्यालय मिळाल्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी पुढील फेऱ्यांतून बाद होणार आहेत. त्यांना अधिक चांगल्या पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेशाच्या संधीपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे हे जाचक नियम राज्य सरकारने बदलावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि संघटनांनी केली आहे.

यंदा ‘सीईटी’च्या दुसऱ्या फेरीत एका विद्यार्थ्याला पसंतीच्या पहिल्या तीनपैकी कोणत्या एका ठिकाणी जागा मिळाली तर तो पुढील फेऱ्यांसाठी बाद ठरतो. तिसऱ्या फेरीत तर ही अट पसंतीच्या पहिल्या सहा महाविद्यालयांपर्यंत लागू करण्यात आली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीतील महाविद्यालय मिळाले तरी अनेक विद्यार्थ्यांना अनपेक्षित किंवा गैरसोयीच्या शाखेत, अनुदान नसलेल्या विभागात किंवा फार संधी नसलेल्या शाखेत प्रवेश घ्यावा लागेल.

अपेक्षित महाविद्यालयात प्रवेशाची इच्छा असूनही या जाचक नियमांमुळे ते पुढील प्रक्रियेतून बाहेर फेकले जाणार आहेत. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करून नियमांमध्ये बदल करावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर शाखेचे अजिंक्य पालकर आणि पुणे शहर काँग्रेसचे अभिजित महामुनी यांच्या वतीने राज्याच्या ‘सीईटी सेल’ला देण्यात आले आहे.

यासंदर्भात जैन म्हणाले, ‘‘तिसऱ्या फेरीत एखाद्या शाखेचा ‘कट-ऑफ’ ९० टक्के असेल आणि एखाद्या विद्यार्थ्याला ८९ टक्के असतील तर पुढच्या फेरीत त्याला त्या शाखेचा किंवा त्याहून चांगल्या शाखेचा पर्याय मिळू शकतो.

सध्याच्या नियमांमुळे मात्र तो विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून थेट बाहेर जातो. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. २०१४ मध्ये अशाच तक्रारी झाल्यानंतर हे नियम रद्द करण्यात आले होते. यावर्षी पुन्हा तेच नियम वेगळ्या पद्धतीने लागू झाले आहेत. आजच्या ‘डिजिटल’ युगात प्रक्रिया सोपी आणि स्पष्ट असायला हवी. सरकारने मात्र जुनाच गोंधळ निर्माण केला आहे.’’

पालकांचाही विरोध
याविषयी एक पालक पूनम काळोखे म्हणाल्या की, ‘प्रवेशप्रक्रियेत गतवर्षी यशस्वीपणे वापरले गेलेले लवचिक निकष यावर्षी हटविण्यात आले. सध्याची पद्धत जास्त गुंतागुंतीची आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी नियमांच्या कात्रीत अडकून हक्काच्या जागांपासून दूर राहत आहेत. गुणवत्तेला न्याय मिळावा आणि विद्यार्थ्यांना संधी नाकारल्या जाऊ नयेत यासाठी सरकारने या नियमांचा फेरविचार करावा.’

प्रतिक्रियेस नकार
यासंदर्भात राज्याच्या ‘सीईटी सेल’चे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

अशाप्रकारे आपण बघितलं की सीईटीच्या परीक्षा पद्धतीत काय बदल झालेला आहे याच्यात माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment